Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे वन हक्क व पेसा सूक्ष्म नियोजन आणि संसाधन व्यवस्थापन केंद्र, शाश्वत तंत्रज्ञान आदिवासी केंद्राचे उद्घाटन

team by team
April 19, 2022
in राज्य
0
नंदूरबार येथे वन हक्क व पेसा सूक्ष्म नियोजन आणि संसाधन व्यवस्थापन केंद्र, शाश्वत तंत्रज्ञान आदिवासी केंद्राचे उद्घाटन

नंदूरबार l प्रतिनिधी
आदिवासी समाजात वन हक्क व पेसा कायदा याबाबत उदासीनता दिसून येते. तसेच त्यांच्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक याप्रकारातही उदासीनता दिसून येते. म्हणून या कायद्याच्या माध्यमातून त्यांच्या सर्वांगिक विकास हा शाश्वत तंत्रज्ञानाचा वापर करणे हे महत्वाचे आहे. तसेच, जंगलामधून मिळणारे वनउपज उत्पादनाचे विपणन करण्यासाठी मार्गदर्शन या केंद्राद्वारे मिळणार आहे. त्या अनुषंगाने मंगळवार रोजी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे अंतर्गत युनिसेक इंडिया संचालित वन हक्क व पेसा सूक्ष्म नियोजन आणि संसाधन व्यवस्थापन केंद्र, तसेच शाश्वत तंत्रज्ञान आदिवासी केंद्र या दोन कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून आभासी पद्धतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे डॉ.राजेंद्र भारुड हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा अधिकारी नंदुरबार मिनल करनवाल यांनी महिलांशी संवाद साधला. तसेच, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले प्रमोदकुमार पवार (अति.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नंदुरबार), डॉ.राजेंद्र दहातोंडे (वरिष्ठ शास्रज्ञ प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार), उमेश भदाणे (मंडळ कृषी अधिकारी, कोरीट), प्रशांत हुमणे (वनक्षेत्रपाल, नंदुरबार), दीपक पाटील (संचालक, युनिसेक इंडिया), संजय इंगळे (प्रकल्प संचालक, युनिसेक इंडिया) हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमाला पेसा अंतर्गत येणार्‍या नंदुरबार जिल्ह्यामधील गावांतील बचत गटातील महिला व पुरुष मोठ्या संखेने उपस्थित होते. तसेच शशिकांत मराठे (प्रकल्प संचालक), परवेश खाटिक (केंद्र समन्वयक) तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक बैसाणे यांनी केले व आभार प्रदर्शन गोविंद साळुंके यांनी केले. तसेच इतर प्रशिक्षित सहकार्‍यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचा रँगिगबाबत होणारे दुष्परिणाम बाबत मार्गदर्शन

Next Post

सव्वाचार लाख ग्राहकांनी वीजबिल भरले ऑनलाईन, घरबसल्या वीजबिल भरण्याकडे वाढता कल

Next Post
सव्वाचार लाख ग्राहकांनी वीजबिल भरले ऑनलाईन, घरबसल्या वीजबिल भरण्याकडे वाढता कल

सव्वाचार लाख ग्राहकांनी वीजबिल भरले ऑनलाईन, घरबसल्या वीजबिल भरण्याकडे वाढता कल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add