Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

संभाजी महाराजांचे पराक्रम, बलिदान चित्तात ठेवले तरच हा हिंदुस्थान टिकेल : शिवशंभू व्याख्याते राजा महाराज शेंडे

team by team
April 18, 2022
in सामाजिक
0
संभाजी महाराजांचे पराक्रम, बलिदान चित्तात ठेवले तरच हा हिंदुस्थान टिकेल : शिवशंभू व्याख्याते राजा महाराज शेंडे

नंदुरबार l प्रतिनिधी
नऊ वर्ष शत्रूशी झुंज देऊन एकही युद्ध न हारलेले छ. संभाजी महाराज यांचे महापराक्रमी जीवन विश्वाला आदर्शमय आहे. फितुरीने संभाजी महाराज यांना औरंगजेबने पकडून ३० दिवस अन्वनीत अत्याचार करून क्रूरपणे हत्या केली पण त्यांनी हिंदुधर्म सोडला नाही त्यांचे पराक्रम, बलिदान चित्तात ठेवले तर आणि तरच हिंदुस्थान टिकेल असे प्रतिपादन शिवाव्याख्याते राजा महाराज शेंडे यांनी केले. ते हिंदु सेवा सहाय्य समितीचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित धर्मवीर छ.संभाजी महाराज यांचा जीवनचरित्रवरील सत्य इतिहासावर आधारित जाहीर व्याख्यान बोलत होते.


डी.आर.हायस्कूल मैदानावर रविवारी आयोजित जाहीर व्याख्यान कार्यक्रमाचा प्रारंभ घोषणा, प्रेरणामंत्राने झाली. व्यासपीठावरील छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज यांचा प्रतिमेचे पूजन आणि मशाल प्रज्वलित करून राजा महाराज शेंडे आणि हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनी सुरुवात केली. प्रमुख वक्ते राजा महाराज शेंडे यांचा सत्कार राजू चौधरी यांनी केला. डॉ नरेंद्र पाटील यांनी कार्यक्रम आयोजन महत्व तसेच हिंदु सेवा सहाय्य समितीचा कार्य आढावा प्रास्ताविकातुन मांडला. यावेळी श्रीराम उत्सव समिती, धुळे पदाधिकारी तसेच शिवछत्रपती नित्य पूजनाला गेली दीड वर्षापासून अखंडपणे अभिषेकासाठी उपस्थित असलेला बाल धारकरी विनायक राजपूत यांचा सत्कार प्रमुख वक्ते हस्ते करण्यात आला.मराठा क्रांती मोर्चाचा वतीने प्रमुख वक्त्यांचा सत्कार नितीन जगताप यांनी केला.
राजा महाराज यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, संभाजी महाराजांकडे शास्त्र आणि शस्त्र दोन्ही होते ते संस्कृत पंडित होते. एकही युद्ध न हारलेले आणि सर्व नीती माहिती असलेला असा एकमेव राजा होता. संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर ही आजचा हिंदु जागा होत नाही कारण आम्ही हिंदू इतिहास वाचत नाही, इतिहासातून शिकल पाहिजे जेणे करून इतिहासाची पुनरावृत्ती टाळता येईल हिंदूंनी संघटित होऊन संभाजी महाराज आपल्या आचरणात उतरवला पाहिजे तर आणि तरच हा देश हिंदुस्थान म्हणून टिकेल. त्यांनी शिवदिग्विजय बखर, शिवकाव्य, फार्बर पेपर (बडा बखर), मराठी साम्राज्याची छोटी बखर असे विविध ग्रंथाचे आणि बखरींचे संदर्भ देऊन धर्मवीर संभाजी महाराज जीवनचरित्र उलगडून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अक्षय कलाल यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिंदु सेवा सहाय्य समितीच्या धर्मसेवकांनी परिश्रम केले.

बातमी शेअर करा
Previous Post

‘जलजीवन मिशन’च्या नंदुरबार जिल्ह्यातील कामांच्या पूर्ततेसाठी सूक्ष्म नियोजन करावे: पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

Next Post

शहादा येथे युवारंग १९ ते २३ एप्रिल दरम्यान रंगणार,महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

Next Post
शहादा येथे युवारंग १९ ते २३ एप्रिल दरम्यान रंगणार,महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

शहादा येथे युवारंग १९ ते २३ एप्रिल दरम्यान रंगणार,महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add