नंदुरबार l प्रतिनिधी
ख्रिस्ती समाजामध्ये गुड फ्रायडे उत्तम शुक्रवार यासाठी मनवतात या दिवशी येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जीव देउन पाप नष्ट केले यासाठी हा दिवस ख्रिस्ती समाजातर्फे साजरा करण्यात येतो असे मुंबई येथील बथुवेल गावित यांनी प्रवचनाच्या वेळी सांगितले.
नंदूरबार येथील एस.ए. चर्च तर्फे फ्रॅंकक्लीन मेमोरियल चर्च मध्ये सकाळी गुड फ्रायडे निमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मुंबई येथील बथूवेल गावित यांनी गुड फ्रायडे बाबत मार्गदर्शन केले येशू ख्रिस्ताने दिलेल्या सात शब्दांबाबत त्यांनी माहिती दिली यावेळी मंडळीचे मुख्य पाळक अनुपकुमार वळवी यांनी मार्गदर्शन केले .
या कार्यक्रमाला चर्चचे अध्यक्ष डॉ राजेश वळवी, नूतनवर्षा वळवी, दिलीप नाईक ,जे.एच. पठारे, लाजरस वळवी ,प्रेमानंद लवणे, मार्थाबाई सुतार, सुरेश जांभिलसा, डॉ.राजेश वळवी, विश्वास पाडवी पंचमंडळीचे सदस्य तथा समाज बांधव उपस्थित होते.