अक्कलकुवा l प्रतिनिधी
कोरानाच्या संकटानंतर यंदा अक्कलकुवा येथे दोन वर्षानंतर जैन समाजाचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांचा जन्म कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री.सकल जैन समाज अक्कलकुवा च्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी 9 वाजेला श्री वासुपूज्यस्वामी स्वामी जिनमंदिर येथून शोभा यात्रा काढण्यात आली. शोभायात्रा शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आली होती, भगवान महावीर स्वामींच्या प्रतिमेची आकर्षक सजावट असलेल्या सुशोभित पालखी ढोल, ताशा सह वाजत-गाजत शोभायात्रा काढण्यात आली. अहिंसा परमो धर्म, वंदे विरम, भगवान महावीर स्वामी की जय’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
जगाला अहिंसेचा मार्ग दाखवून मानवी जीवन समृध्द करणारे भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याणक महोत्सव अक्कलकुवा शहरात अभूतपूर्व उत्साहात यंदा साजरी करण्यात आली.
शोभायात्रा जैन मंदिर परिसरात सांगता करण्यात आली पश्यात स्वामीवात्सल्य च्ये आयोजन करण्यात आले होते तसेच दुपारी एक वाजेला सामयिक प्रभु वीर के नाम कार्यक्रम अंतर्गत सामूहिक आयोजन करण्यात आले होते.तसेच संध्याकाळी प्रत्येक घराबाहेर दिवे लाउन रोशनाई करण्यात आली होती.व रात्री प्रभु भक्तिचे आयोजन ही करण्यात आले होते. यावेळी शोभायात्रे सह सर्व कार्यक्रमात जैन समाज बांधव, महिला, युवा वर्ग मोठय़ा संख्येने सहभागी झाला होता.