नंदुरबार | प्रतिनिधी
एस.ए.एम. ट्रस्ट नंदुरबार संचलित एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी ऑनलाईन वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये शाळेतल्या जवळपास ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला ,यात वक्तृत्व स्पर्धेत प्रथम सिद्धांत संदीप मुळे (५ वी) , प्रथम रितेश दीपक नांद्रे (६ वी),प्रथम तनिषा सुनील कोकणी (७ वी), प्रथम स्वाती दिलीप पावरा (८ वी), प्रथम सार्थक चंद्रशेखर पवार (९ वी), प्रथम चंचल विनेश वळवी ( १० वी).निबंध स्पर्धा- प्रथम भूमी गणेश मराठे (६ वी),प्रथम राजकुमारी नितीन भोई (७ वी), प्रथम अंजली अरुण चौधरी (८ वी),प्रथम प्रणाली शांतू गावित (९ वी), प्रथम प्रिया दिलवरसिंग पावरा (१० वी) या वर्गातील विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. सर्व यश प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांचे प्राचार्या सौ.नूतनवर्षा वळवी यांनी प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन केले. सदर कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक व्ही. आर. पवार, पर्यवेक्षक ऐ. आर.गर्गे, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद दीक्षित यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण पाटील यांनी मानले.