Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार ते निझर रस्त्यावर दुचाकी आडव्या लावुन ५ मालट्रकांच्या काचा फोडल्या, चालकांना मारहाण करीत लुटले, तीन जणांना अटक

team by team
April 5, 2022
in क्राईम
0
नंदुरबार ते निझर रस्त्यावर दुचाकी आडव्या लावुन ५ मालट्रकांच्या काचा फोडल्या, चालकांना मारहाण करीत लुटले, तीन जणांना अटक

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार ते निझर रस्त्यादरम्यान सुदर्शन पेट्रोल पंपाच्या पुढे रस्त्यावर दुचाकी आडव्या लावुन मालट्रकांवर दगडफेक व मारहाण करीत दहशत निर्माण करून ट्रकचालकांना जबरीने लुटल्याची घटना घडली . या मारहाणीत दोन ट्रकचालक जखमी झाले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुध्द दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार ते निझर रस्त्यावर असलेल्या सुदर्शने पेट्रोल पंपाच्या काही अंतरावर दि.४ मार्च रोजी मध्यरात्रीच्या वेळी रस्त्याच्या मधोमध मोटारसायकली आडव्या उभ्या करुन सहा जणांनी मालट्रकांवर दगडफेक करुन दहशत निर्माण केली . या दगडफेकीत मालट्रक ( क्र.एम.एच. १ ९सी.वाय . ७३८५ ) , मालट्रक ( क्र.एम.एच. ४१ ए.यु .२ ९ ३८ ) , मालट्रक ( क्र . एम . एच . १८ ए.एन. ८६८६ ) , मालट्रक ( क्र.एम.एच. १८ ए.ए. ९ ५२६ ) . मालट्रक ( क्र.एम.एच. १५ जी.व्ही .८७ ९ ५ ) या पाच ट्रकांच्या काचा फोडुन नुकसान करण्यात आले . तसेच ट्रकांवरील चालक सहचालकांना हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली . चालक सुरेश बाबुलाल राठोड यांच्या खिश्यातुन २ हजाराची रोकड व ७ हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरीने चोरुन नेला आहे . या मारहाणीत सुरेश बाबुलाल राठोड रा.जळगांव , पंकज शालीक चव्हाण रा.मालेगांव हे दोघे ट्रकचालक जखमी झाले आहेत . याप्रकरणी सुरेश बाबुलाल राठोड रा. सुभाषवाडी, जळगाव यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलीस ठाण्यात बादल रमेश वळवी , राकेश राजु भिल , राजु सुरेश भिल , सनी राजु शिंदे चौघे रा.एकतानगर, नंदूरबार व दोन अल्पवयीन युवक अशा सहा जणांविरुध्द भादंवि कलम ३९५ , ३४१ , ३२४ , ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणातील
राकेश राजु भिल , राजु सुरेश भिल , सनी राजु शिंदे या तिघांना पोलीसांनी अटक केली असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड हे करीत आहेत .

बातमी शेअर करा
Previous Post

दांड्याचा वार करुन व्यापाऱ्याचे पाच लाख लुटले

Next Post

भूमि अभिलेख विभागास रोव्हरची पाच यंत्रे उपलब्ध

Next Post
भूमि अभिलेख विभागास रोव्हरची पाच यंत्रे उपलब्ध

भूमि अभिलेख विभागास रोव्हरची पाच यंत्रे उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add