म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथे भीम जयंती उत्सव समिती म्हसावद 2022 जयंती निमित्त बैठक घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष गौतम अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन समिती स्थापन करण्यात आली.
समस्त समाज बांधव यांच्या सर्वानुमते मत व्यक्त करण्यात आले, व पुढील कामाची रूपरेषा ठरवण्यात आली. यावेळी भीम जयंती उत्सव समिती म्हसावद 2022 चे अध्यक्ष म्हणून आयु. विक्रांत अहिरे यांची निवड केली असून तर,उपाध्यक्ष संघर्ष अहिरे म्हणून यांची निवड करण्यात आली. तसेच खजिनदार राहुल बागले,
सचिव शुभम आगळे, सदस्य पदी सिध्दार्थ पिपंळे,अनिल अहिरे, अमोल अहिरे, तुषार बैसाणे, ऋशिकेश वाघ,बुध्दभुषण जाधव,निलेश गवळे, सतिश आखाडे,कृष्णा आगळे, अभिषेक जाधव, आकाश आखाडे, कार्तिक पिंपळे,
यांची समिती स्थापन करण्यात आली असून सर्वानुमते जाहीर करण्यात आले. यावेळी चुनीलाल अहिरे,रविकांत महिन्द्रे,मुकुंद अहिरे,पत्रकार पुलायन जाधव,छोटूलाल बैसाणे,महेंद्र बैसाणे,मोहन अहिरे,मधुकर अहिरे,नरेश गवळे, तुषार बैसाणे, शांतीलाल गवळे, रमाकांत अहिरे, गौतम आगळे, रवींद्र अहिरे आदि समाज बांधव उपस्थित होते.सूत्रसंचालन महेंद्र आगळे यांनी केले.