Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे आढळला दुर्मिळ काळतोंड्या साप

team by team
April 4, 2022
in कृषी
0
नंदुरबार येथे आढळला दुर्मिळ काळतोंड्या साप

म्हसावद l प्रतिनिधी
नंदुरबार येथे रामदेवनगर भागात दुर्मिळ असणारा काळतोंड्या नावाचा बिनविषारी साप आढळून आला.वन्यजीव संस्था नंदुरबारचे सर्पमित्रांनी त्याची वनविभागात अधिकृत नोंद करून सुरक्षीत स्थळी निसर्गाच्या सानिध्यात सोडले.
याबाबत अधिक वृत्त असे की,बुधवारी संध्याकाळी सी.बी.गार्डन भागात रामदेवनगरमध्ये साप असल्याची माहीती गिरीश ईश्वर तारडे यांनी वन्यजीव संस्था नंदुरबारचे सदस्य यांना कळवली.त्यानुसार नंदुरबार येथील वन्यजीव संरक्षण संस्था नंदुरबार चे सदस्य सर्पमित्र संजय वानखेडे, देवेंद्र वसईकर,चेतन पाटील,राहुल गोस्वामी यांनी दुर्मिळ प्रजातीच्या काळतोंड्या साप पकडला. यापुर्वीही म्हसावद ता.शहादा येथेही सखाराम लिमजी चौधरी यांच्या घरी स्वयंपाकगृहात 21 मार्च 2021 रोजी सुधाकर पाटील ,जयंत पाटील यांनी काळतोंड्या सर्पाला पकडून जिवदान दिले आहे. डुमरिल काळतोंड्या ही भारतीय द्विपकल्पातील विस्तृतपणे वितरित झालेली प्रजाती आहे. भारतातून यातील तीन प्रजाती नोंदवल्या गेल्या आहेत. त्यामधील दोन उत्तर भारतात आणि उत्तर-पूर्व राज्यात आढळतात. या सापाला ‘डयुमेरिल्स ब्लॅक हेडेड स्नेक’ या नावानेसुद्धा ओळखले जाते. याचे शास्त्रीय नाव ‘सितिनोफिस सबपंक्टॅटस’ असूनयाचे तोंड काळे असल्यामुळे मराठी त्याचे नाव काळतोंड्या अशी पडले आहे. याची सरासरी लांबी २५ ते जास्तीत जास्त ४६ सेमी असते. याचा रंग लालसर तपकिरी असून शरीरावर अगदी बारिक काळे ठिपके असतात. या सापाची विशेष खूण म्हणजे डोके काळे व लांब गोलाकार शरीर असते. हा बिनविषारी जातीचा साप आहे. हुबेहूब असाच दिसणारा काळे डोके मात्र शेपटीवरही काळा पट्टा असलेला ‘पोवळा ‘ नावाचा साप आहे मात्र हा पोवळा साप विषारी असतो. या दोन सापांच्या रंग व आकारातील साम्यामुळे बिनविषारी काळतोंडय़ा सापाला विषारी ‘पोवळा’ समजून मारले जाते. काळतोंडय़ा सापाचे खाद्य लहान पाली, किडे किंवा इतर छोटे साप हे आहे. हा साप पालापाचोळ्यात राहणे पसंत करतो.याबाबत नंदुरबारचे वनक्षेत्रपाल प्रशांत हुमणे,वनपाल युवराज भाबड, दिनेश बागूल,रवि गिरासे यांना सर्पमित्रांनी माहीती देवून अधिकृत नोंद केली. सर्पमित्र प्रतिक कदम,स्वप्निल इंगळे यांनी माहीती देवून सहकार्य केले.

बातमी शेअर करा
Previous Post

रजाळे येथे रामनवमीला श्रीराम मुर्तींची प्राणप्रतिष्ठा, आजपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन

Next Post

म्हसावद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती स्थापन

Next Post
म्हसावद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती स्थापन

म्हसावद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती स्थापन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add