म्हसावद, खापर l वार्ताहर
राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदी सेवानिवृत्त पशुधन आयुक्त डॉ.किशोर सामुद्रे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय अपंग विकास महासंघाची बैठक शहादा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या सभागृहात संपन्न झाली.सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे राज्य उपाध्यक्ष शिवाजीराव मोरे हे होते यावेळी राज्य उपाध्यक्ष यांनी नंदुरबार जिल्ह्यात करण्यात आलेल्या कार्याचा आढावा घेतला त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व परवानगीने आयत्या वेळी उपस्थित विषयांवर चर्चा करून नंदुरबार जिल्हा शाखेचे रिक्त पद भरण्याचे ठरले या पदावर प्रशासकीय सेवेतील अभ्यासु सेवानिवृत्त पशुवैद्यकीय आयुक्त डॉ. किशोर सामुद्रे यांची सर्वानुमते जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. सभेत उपस्थितांना प्रदीप कलाल,डॉ किशोर सामुद्रे यांनी मार्गदर्शन केले. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉ.किशोर सामुद्रे यांचे जिल्हा उपाध्यक्ष जयपाल परदेशी,प्रमोद बैसाणे, जिल्हा समन्वयक राजाभाऊ कुवर, जिल्हा महिला उपाध्यक्ष भाग्यश्री कुवर, जिल्हा महिला सरचिटणीस सुनिता कुवर, जिल्हा सल्लागार संजय चौधरी, फारुक शेख, जिल्हा संचालक गुलाब गावित, संतोष मराठे, राजेंद्र पाटील,राजेंद्र नांदोडे, शिवदास पावरा, खलील शेख, मधु नाईक, सुनील मिस्त्री, दिलावर खान यांनी पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन अभिनंदन केले.