Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सुनील जोशी यांना आदर्श ग्राम पुरोहित पुरस्काराने सन्मानित

team by team
April 4, 2022
in सामाजिक
0
सुनील जोशी यांना आदर्श ग्राम पुरोहित पुरस्काराने सन्मानित

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील जयनगर येथील ग्रामपुरोहित सुनील जोशी यांना श्री. हेरंब गणेश ट्रस्टच्या वतीने आदर्श ग्राम पुरोहित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
येथील श्री हेरंब गणेश ट्रस्टच्या वतीने व ग्रामस्थांच्यावतीने आज नववर्षाचे औचित्य साधून गुढीपाडवाच्या दिवशी ट्रस्टचे सदस्य शरद गोपाल पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या अगोदरही सुनील जोशी यांना 2010 साली नाशिक येथे शंकराचार्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले होते. जोशी हे मागील 35 वर्षांपासून जयनगर तसेच पंचक्रोशीसह मध्यप्रदेश, गुजरात व संपूर्ण महाराष्ट्रात ग्राम पुरोहिताचे काम करत आहेत. तसेच मागील 25 वर्षापासून भागवत कथेचे निरूपण व किर्तनकार म्हणूनही परिसरात प्रसिद्ध आहेत. 70 वर्षापूर्वी गावाचे माजी सरपंच कै. राजाराम मक्कन माळी यांनी गावात पुरोहितची आवश्यकता होती म्हणून सुनील जोशी यांच्या वडिलांना गावात पुरोहित म्हणून आणले होते. त्यांचा वारसा सध्या सुनील जोशी सांभाळत असून सामाजिक बांधिलकी म्हणून ते भागवत कथेचे निरूपण व किर्तन सादरीकरणाचे काम करत असतात, म्हणून ट्रस्टच्या वतीने व गावकऱ्यांच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले.
गणपती मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन निवृत्त मुख्याध्यापक रमण माळी यांनी केले, तर ट्रस्टचे सचिव दगडू पाटील, सदस्य झिपा पाटील, ईश्वर वारुळे, राजाराम पाटील, किशोर माळी, दिनेश माळी, सुपा माळी, बापू शुक्ल, किशोर पाटील गंगाराम नगराळे संतोष पारधी भावराव रोकडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा येथे शिवसेना व युवासेनेतर्फे जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढ़ीच्या निषेधार्थ मिठाई वाटून उपहासात्मक आंदोलन

Next Post

राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदी डॉ.किशोर सामुद्रे नियुक्त

Next Post
राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदी डॉ.किशोर सामुद्रे नियुक्त

राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदी डॉ.किशोर सामुद्रे नियुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add