नंदुरबार | प्रतिनिधी
अखिल भारतीय साहित्य परिषद , महाराष्ट्र प्रदेश देवगिरी प्रांताध्यक्षपदी श्रीकांत उमरीकर तर प्रांत संघटन मंत्री म्हणुन नंदुरबारचे शशिकांत घासकडबी यांची निवड करण्यात आली आहे.
नुकतीच मुंबई येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी समितीत महाराष्ट्रात नव्याने विदर्भ , देवगिरी , पश्चिम महाराष्ट्र व कोकण अशी नव्याने चार प्रांत रचना करण्यात आली . महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा . प्रविण दवणे तसेच कार्याध्यक्ष प्रा . नरेंद्र पाठक व प्रदेश कार्यकारिणी समवेत झालेल्या चर्चेनुसार देवगिरी प्रांत कार्यकारिणी घोषित करण्यात आली . देवगिरी प्रांतांध्यक्षपदी संभाजीनगर ( औरंगाबाद ) येथील जेष्ठ साहित्यिक श्रीकांत उमरीकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर प्रांत कार्याध्यक्षपदी जळगांव येथील प्रा . डॉ . पुरुषोत्तम पाटील यांची निवड करण्यात आली आहे . उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- देवगिरी प्रांत कार्यकारिणी २०२२–२०२३ अध्यक्ष श्रीकांत उमरीकर ( संभाजीनगर ), कार्याध्यक्ष प्रा . डॉ . पुरुषोत्तम पाटील ( जळगांव ), उपाध्यक्ष प्रा.रविंद्र बेंबरे ( देगलूर , नांदेड ), उपाध्यक्ष प्रदीप नणंदकर ( लातूर ), कोषाध्यक्ष प्रा . संजय गायकवाड ( संभाजीनगर ) प्रांत मंत्री प्रा . विजय लोहार ( जळगांव ) प्रांत संघटनमंत्री शशिकांत घासकडबी ( नंदुरबार ), प्रांत प्रचार प्रमुख उमेश काळे ( संभाजीनगर ), संरक्षक ऍड . सुशील अत्रे ( जळगांव ), सदस्य श्रीमती प्रभा बैकर ( धुळे ), शैलेश काळकर ( अंमळनेर ) नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे सर्व प्रदेश कार्यकारिणी कडून अभिनंदन करण्यात आले असून लवकरच नवीन प्रांत कार्यकारिणीची बैठक घेण्यात येऊन आगामी योजनेबाबत चर्चा करण्यात येईल .