तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील खर्डी बुद्रुक अंतर्गत अंबागव्हाण व सितापावली येथे गावाला स्वातंत्र्यानंतर विज पोहचली आहे. आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते वीज ट्रान्सफार्मर लोकार्पण करीत वीज पुरवठा सुरू केला आहे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
डोंगरी विकास कार्यक्रम 2020 अंतर्गत दहा लाखांचा निधी उपलब्ध करून दिला 63 टक्के के. व्ही च्या ट्रान्सफर्मर बसवून गावाला विजेचा पुरवठा करण्यात आला त्याच्या लोकार्पण सोहळा आज करण्यात आला. तसेच सीता पावली येथे स्वतंत्र विजेचे उपलब्ध नव्हती दहा लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला 63 के.व्ही.ट्रान्सफार्मर बसवून विद्युत पुरवठा करण्यात आला शुभारंभ करण्यात आला.
यावेळी पंचायत समितीचे सभापती यशवंत ठाकरे, सरपंच पाडवी, जिल्हा परिषदेत प्रकाश वळवी, कार्यक्रमास विठ्ठल बागले, वीरसिंग पाडवी, स्वीय सहाय्यक किरण सूर्यवंशी, प्रवीण वळवी, जोलू ठाकरे गावातले ग्रामस्थ व इतर कार्यकर्ते स्त्री-पुरुष उपस्थित होते.