Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव येथे आदिवासी पावरा समाज विचार मंचच्या सभेत बालविवाहाला प्रतिबंधासह विविध ३३ ठराव पारित

team by team
March 29, 2022
in सामाजिक
0
धडगाव येथे आदिवासी पावरा समाज विचार मंचच्या सभेत बालविवाहाला प्रतिबंधासह विविध ३३ ठराव पारित

धडगाव l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील आदिवासी पावरा समाज विचार मंच तर्फे सहविचार सभा घेण्यात आली.या सभेत बालविवाहाला पूर्ण पणे प्रतिबंध करण्याच्या ठरावासह समाजहिताचे विविध ३३ ठराव पारित करण्यात आले.


या सभेच्या अध्यक्षस्थानी म्हणून आदिवासी पावरा – बारेला समाज मंडळाचे अध्यक्ष नामदेव पटले,तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त अभियंता झेलसिंग पावरा,सुरेश मोरे,लुका पावरा,गौतम खर्डे,सुनील बर्डे,मेहरबान बर्डे, परमानंद डुडवे, पदमसिंग चव्हाण,उमेश भोसले,दिनेश भोसले, मंगला पावरा धडगाव तालुका आदिवासी पावरा समाज विचार मंचचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष धनसिंग पावरा,उपाध्यक्ष आंग्रेशा पावरा, सचिव फेंदा पावरा,शंकर पावरा,विजया पावरासह,पावरा समाजातील सर्व पोलीस पाटील, सरपंच, अधिकारी- कर्मचारी विविध संघटनांचे पदाधीकारी कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.
या सभेला विवाह,मयत व अंत्यविधी संबंधी तसेच इंदल कार्यक्रमासंबंधी ठराव पारित करण्यात आले.
विवाह — त्यात विवाह संबंधी आदिवासी पावरा समाजात लग्नामध्ये मुलींना देजा (दहेज)देऊन सन्मान करण्यात येतो. परंतु या देजाची रक्कम अनियंत्रित होत चालल्यामुळे, ती समान असावी यासाठी मागील वर्षी ११ हजार ४९ रुपये एवढी रक्कम ठरवली तीच रक्कम यंदाही कायम ठेवण्यात आली. या उपरांत कोणी जास्त रक्कम देज केली किंवा घेण्याचा प्रयन्त केला तर त्यांना देण्याच्या रकमेएवढाच दंड आकारण्यात येईल, आदिवासी पावरा समाजात बालविवाह होत नसले तरी समाज खबरदारी म्हणून कायद्या प्रमाणे मुलीचे लग्नाचे वय १८ व मुलाचे वय २१ झाल्या शिवाय लग्न करू नये.यासह २० ठराव पारित करण्यात आले.
मयत — मयत व अंत्यविधी संबंधी ठरावामद्ये मृत व्यक्ती च्या प्रेतावर कपडे टाकण्याची प्रथा मोठया प्रमाणात असल्याने यापुढे गरजेनुसार घरच्यांनीच कपडे टाकावेत.इतर कोणीही कपडे नेऊ नये,नेल्यास दंड आकारला जाईल तसेच मृतांवर पैसे उधळण्याची प्रथा बंद करून त्या ऐवजी फुले उधळण्यात यावी.व अंत्यविधीवेळी वडाय, पाचच करण्यात आली.यासह १० ठराव करण्यात आले.
इंदलकार्यक्रम ठराव -इंदल हा कार्यक्रम आदिवासी संस्कृतीचा अविभाज्य भाग असला तरी तो वैयक्तिक पूजेचा कार्यक्रम असल्यामुळे पैशाची भेट व बकऱ्याची भेट घेणे बंद करावे.या कार्यक्रमाचा प्रसाद म्हणून जेवणाचा कार्यक्रम करू शकतात.तरीही भेट न घेतल्यामुळे लोकं जेवायला येत नसल्याने या ठिकाणी ठराविक रक्कम देऊन प्रसाद सेवन करण्याची मुभा असावी नाही तर इंदल हा पावरा समाजाचा संस्कृतीचा भाग असलेला सण नामशेष होण्याची शक्यता आहे.इंदल कार्यक्रमाचा निरोप देतांना पत्रिका छापू नये,केवळ नेवता देऊनच आमंत्रण द्यावे.पत्रिका छापणे आवश्यक असेल तर भेट व बकऱ्याची भेट स्वीकारली जाणार नाही असा स्पष्ट उल्लेख करावा. असा ठराव पारित केला गेला.या कार्यक्रमासाठी राजू पावरा,तुकाराम पावरा, सुकेदव पावरा दिलवरसिंग पावरा,शैलेश पावरा, के.के. पावरा,करण पावरा,मोहन पावरा,विजू महाराज,बळीराम पावरा,सुकलाल पावरा,बटेसिंग पावरा,प्रवीण पावरा,राकेश पावरा,सचिन पावरा,अशोक पावरा, ॲड. योगेश भंडारी आदीनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

लोकसेवा आयोग संयुक्त पुर्व परीक्षा-2021 परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

Next Post

अक्कलकुवा पोलिसांनी पोलीस स्टेशनच्या आवारात लावली पाणपोई

Next Post
अक्कलकुवा पोलिसांनी पोलीस स्टेशनच्या आवारात  लावली पाणपोई

अक्कलकुवा पोलिसांनी पोलीस स्टेशनच्या आवारात लावली पाणपोई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add