नवापूर l प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील चिंचपाडा ते वडकूट रेल्वे फाटकाच्या दरम्यान एका शेताच्या झाडाझुडुपांमध्ये दहा ते पंधरा दिवसांचा स्त्री जातीचे जिवंत बाळ उघड्यावर मिळून आले. याबाबत चिंचपाडा पोस्ट येथे खबर देत चिंचपाडा प्राथमिक आरोग्य केंद्र त्या बाळावर उपचार करीत बाळाच्या संदर्भात माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की नवापुर तालुक्यातील चिंचपाडा ते वडकुट रेल्वे फाटकाच्या दरम्यान एका शेतात झाडाझुडपांनी मध्ये एक बेवारस दहा ते पंधरा दिवसांच्या स्त्री जातीचा जिवंत बाळ मिळून आला रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीस ते दिसले त्यांनी असलेल्या चिंचपाडा आऊटपोस्ट येथे माहिती देताच असई बळवंत वळवी ,पोलीस नाईक जितेंद्र चव्हाण ,चिंचपाडा गावचे कारभारी संतोष वसावे यांनी घटनास्थळा जाऊन बाळाला ताब्यात घेत चिंचपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करत त्याच्यावर योग्य ते उपचार केले याबाबत अस ई बळवंत वळवी यांनी नवापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली सदरचे बाळ ज्या कोणाचे असेल त्यांनी नवापूर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी केले आहे.










