नंदुरबार | प्रतिनिधी
नगरपालिका संचलित लोकमान्य टिळक विद्यालयातील वर्ग खोल्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन शिवसेनेचे नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शालेय कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
नंदुरबार नगरपालिकेकडून विविध विकासकामे करण्यात येत आहेत. पालिका संचलित लोकमान्य टिळक विद्यालयातील विद्यार्थ्यांना अधिकाधिक शिक्षणाची चांगली सोय उपलब्ध व्हावी यासाठी वर्ग खोल्या बांधकामाच्या ठराव करण्यात आला होता. त्यानुसार आज रोजी शिवसेनेचे नेते, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी शाळा परिसराची पाहणी करीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत.कोरोनाचा संभाव्य तिसर्या लाटेची शक्यता लक्षात घेत शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना माजी आ.रघुवंशी यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांना केल्या.
यावेळी मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, बांधकाम सभापती प्रमोद शेवाळे, नगरसेवक यशवर्धन रघुवंशी,कुणाल वसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, फारूक मेमन,चेतन वळवी, फरीद मिस्तरी,नगरसेवक सुनील सोनार,प्रशांत चौधरी,श्रीमती संगीता सोनवणे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अबुल हसनात,राजू इनामदार,हरून हलवाई, मुख्याध्यापक शेख व पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.