नंदूरबार l प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग ७५३ बी ते सोमावल ते नर्मदानगर एम डी आर १ ते एम डी आर ४४ पर्यंत एकूण ६ कि.मीच्या रस्त्याचे आज एका बाजूने भाजपाच्या खा.डॉ.हिना गावीत तर दुसऱ्या टोकाला भाजपाचे आ.राजेश पाडवी यांनी भूमिपूजन केले. त्यामुळे भाजपाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

राज्यातील भाजपाच्या १०५ आमदारांना केंद्र शासनाच्या सेंट्रल रोड अँड इंन्फ्रास्ट्रक्चर फंड अर्थात सीआरआयएफ योजनेतून प्रत्येकी १० कोटी रुपयांचे रस्ते केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांनी मंजूर केले आहेत. यात राष्ट्रीय महामार्ग ७५३ बी ते सोमावल तर नर्मदानगर एम डी आर १ ते एम डी आर ४४ पर्यंत एकूण ६ कि.मीच्या या रस्त्याचाही समावेश आहे. यासाठी लागणारा निधी नंदुरबार चा सार्वजनिकन बांधकाम विभागाकडे वर्ग देखील करण्यात आला.आज या बाबत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला 6 कि.मी.च्या रस्त्याचे सोमावल येथे आ.राजेश पाडवी यांनी भूमिपूजन केले.तर दुसऱ्या बाजूला नर्मदा नगर येथे खा.डॉ.हिना गावीत यांनी उद्घाटन केले.त्यामुळे भाजपाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.








