खापर l शिवमकुमार मोरे
अक्कलकुवा येथील मेन रोड वरील व्यापारी विजय गौतमचंद जैन (डागा) यांचा सोरापाडा येथील दुकानाला दि. 22 मार्च रोजी रात्री 7:30 ते 8:00 वाजेच्या सुमारास दुकानाला अचानक आग लगल्याने परिसरात एकच धावपळ उडाली सदर आगिचे कारण मात्र समजू शकले नाही.
शहरातील राजेंद्र किराणाचे मालक विजय गौतमचंद जैन (डागा) यांचा दुकानाला मंगळवारी अचानक लागलेल्या आगीमुळे दुकानातून धुर बाहेर येत असल्याने परिसरातील नागरिकांनी दुकानातील साहित्य बाहेर काढण्यासाठी पर्यंत केले मात्र दुकानाचा शटर लवकर उघड़ता न आल्याने दुकानातील अंदाजीत लाखो रूपयाचे माल जळून खाक झाल्याचे समझते आगिचे नेमके कारण समजू शकले नाही सदर आग आटोक्यात आण्यासाठी अग्निशामक दलाशी संर्पक करण्यात आले होते.अग्निशामक येईपर्यंत स्थानिक नागरीकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.