म्हसावद l पुलायन जाधव
शहादा तालुक्यातील टेंभा त.सा जवळील नवे टेंभा (ता. शहादा) येथे जिल्हा परिषद अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्ती व वाढीव पाईप लाईन दुरुस्तीच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी वडाळी गणाच्या पंचायत समितीच्या सदस्या चंदनबाई पानपाटील, जयनगर गणाच्या पंचायत समिती सदस्य बानुमती ईशी, ब्ल्यूटायगर ग्रुप चे अध्यक्ष देवेंद्र पानपाटील, सरपंच मेघा गिरासे, उपसरपंच रंजना माळीस, ग्रामपंचायत सदस्य सिमा गिरासे, सामाजिक कार्यकर्ते दिग्विजयसिंह गिरासे, रमण जावरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता पी. आर. दरेवार, शाखा अभियंता एम. पी. बिब्बे, सामाजिक कार्यकर्ते गोपाल गिरासे, दिलावर माळीस, खैरवे भडगावचे माजी सरपंच उमेश पाटील, स्वीय सहाय्यक गणेश पाटील, सारंगखेडा येथील तुळशीराम कोळी, रवींद्र कुवर, सुनिता माळीस, ईश्वर माळीस, भैय्या पाटील, रमण जावरे आदी उपस्थित होते.
यावेळी ॲड.सीमा वळवी म्हणाल्या की,शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजे हे आमचे ध्येय आहे त्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोचविता येईल यासाठी मी कटिबद्ध आहे. तापी नदी बॅरेज जवळ असल्यावर ही पिण्याच्या पाण्याची टंचाई ग्रामस्थांना भासत असल्याचे दिसते. ग्रामस्थांनो काळजी करू नका काही काळातच पाणीटंचाई दूर करू असे आश्वासन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांनी केले.
यावेळी ॲड.वळवी पुढे म्हणाल्या की, पाईप लाईन व पाण्याच्या टाकीच्या दुरुस्ती कामाच्या शेजारी असलेल्या विहिरीला कमी प्रमाणात पाणी आहे. पण त्याच्याही बाजूला असलेल्या पूर्णक्षमतेच्या विहिरीला पाणी आहे. परंतु त्याठिकाणी विजेची सोय नाही यासाठी मी ट्रांसफार्मर, इलेक्ट्रिक पोल व वीज कनेक्शनची व्यवस्था जिल्हा परिषदे अंतर्गत विशेष निधी प्राप्त करून लवकरच विजेची सोय करून पूर्ण क्षमतेचे पाणी असलेल्या विहिरी वरून गावात पाणी पोहोचवणार असे प्रतिपादन ॲड.सीमा वळवी यांनी केले.
आदिवासी भगिनींनी घातले पाण्यासाठी साकडे
ताई तुम्ही पहिल्या जिल्हा परिषदना अध्यक्षा सत माय की, निदान आमना गावपाडा लगून तरी उनात. आम्हला फक्त पेवाना पाणीनी सोय करी देवा,..आंम्हू मोलमजुरी करणारा लोक सत आम्हला कामधंदा सोडीसन पाणी लेवाना कुरता दूर दूर लुगी जाना पडस,… ! एक बात सांगू का ताई कोरोना ना टाईमला सना आम्हुं पाणी लेवाले जाऊत तव्हय येक्कज जागे भट्टी गर्दी व्हये त्याम्हा आम्हले अख्खा गावालासले कोरोना व्हई गयता, काय सांगू ताई तश्या दिन परत येवाले नको…! फक्त हा म्हणू नका ताई तुम्ही पहिल्या अध्यक्षा शेत की तुम्ही नवा टेंभा गाव पर्यंत उनात त्यामुळे तुम्हणा आम्हेन खूप आभारी शेतस ! अशा केविलवाणी व्यथा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा गावात आल्याबरोबर आदिवासी भगिनींनी मांडल्या आपल्याला लवकरच आपल्या पाण्याची समस्या सुटेल अशी ग्वाही ॲड. सीमा वळवी यांनी उपस्थित महिलांना दिली .
कायमस्वरूपी ग्रामसेवकाची मागणी
सरपंच प्रतिनिधी म्हणून गोपाल गिरासे यांनी ग्रामसेविकाताई सध्या रजेवर आहेत. त्यासाठी आम्हाला विकासकामांसाठी प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यासाठी कायमस्वरूपी ग्रामसेवक द्या जेणेकरून मार्च अखेरपर्यंत आम्हाला इलेक्ट्रिक खांब ट्रांसफार्मर इस्टिमेट असे एकत्र प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यासाठी ग्रामसेवक नसल्याने प्रशासनाचा निधी परत जाणार नाही व आमचे गाव विकास कामांपासून वंचित राहणार नाही. आम्हाला कायमस्वरूपी ग्रामसेवक द्यावा शहादा गट विकास अधिकारी त्याच्याकडून ग्रामसेवक नेमणुक करण्याच्या सूचना करते गावाला पूर्ण क्षमतेने पाणी पुरे त्या विहिरीवर नवीन ट्रांसफार्मर इलेक्ट्रिक पोल बसवण्यासाठी निधी द्यावा तसेच आमच्या येथील घरकुल ड यादीत असले नाव लाभार्थी पात्र असूनही वगळण्यात आली यांना पुन्हा समाविष्ट करून घ्यावी अशी मागणी केली. त्या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांनी ग्रामपंचायतीमार्फत विशेष ग्रामसभा घेऊन नवीन यादी तयार करा आपण यादी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले
जि. प. अध्यक्षांनी जागेवरूनच केला वीज वितरणचे अधिकाऱ्यांना फोन करीत ग्रामस्थांची इलेक्ट्रिक लाईट अभावी पाणी टंचाई भासते यासाठी संपूर्ण गावाला पूर्ण क्षमतेची विहिरी आहेपण तिला विजेची सोय नाही आपण तात्काळ ट्रान्सफार्मर इलेक्ट्रिक पोल साठी इस्टिमेट तयार करण्यासंदर्भात आता ग्रामपंचायत प्रशासनास मदत करा जिल्हा परिषद अंतर्गत निधी उपलब्ध करून देऊन अशा वीज वितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.त्यामुळे नवे टेंभा येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.