Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वडाळीत 10 एप्रिलला कानुबाई मातेचा बाहेरो लग्नोंत्सव ; लग्न लावण्यासाठी संपर्क साधण्याचे आयोजकांचे आवाहन

team by team
March 16, 2022
in सामाजिक
0
वडाळीत 10 एप्रिलला कानुबाई मातेचा बाहेरो लग्नोंत्सव ; लग्न लावण्यासाठी संपर्क साधण्याचे आयोजकांचे आवाहन

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील वडाळी येथे 10 एप्रिल बाहेरो लग्नोत्सव होणार आहे. यानिमित्त 17 मार्च ते 11 एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्याला नावनोंदणी केलेल्या जोडप्याचे बाहेरो लग्न होणार असून, कानुमाता बाहेरो विवाह सोहळ्यात लग्न लावण्यासाठी इच्छुकांनी संपर्क साधून, विवाह  विनामूल्य लावावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने सुशीलाबाई माळी, रमेश माळी आणि देविदास माळी यांच्या निवासस्थानी बोहेरो लग्नाचा योग्य आला असून, गुरूवारी (ता. 17) ध्वजारोहन, दांडा रोहणे, रविवारी ( ता.03 एप्रिल ) गायपूजन व कुदळी टाकणे, मंगळवारी (ता. 05) कानुमातेचे रत्न आणणे, पोखणे, बुधवारी (ता. 06), कस्तुरी आणणे, गवरणी विडा, कानुमाता मिरवणूक थाट, गुरुवारी (ता.07) रास पूजने, माल दळणे शुक्रवारी (ता.08) पीठ गाळणे, गाणे म्हणणे शनिवारी (ता.09) पाणी भरणे, कन्हेर आणणे, गवरणीच आगमन रविवारी (ता.10) भोजन भरणे, महाप्रसाद व सायंकाळी सहाला बाहेरो लग्न लावणे, सोमवारी (ता. 11) कानूमाता विसर्जनाचा कार्यक्रम, असे आठ दिवसांचे कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. आठ दिवस चालणाऱ्या कानुमातेच्या विधिवत पूजेसाठी व बाहेरो लग्न समारंभासाठी माजी पं.स.समिती सदस्य गिरीष जगताप, पोलीस पाटील गजेंद्रगिर गोसावी,माजी उपसरपंच हिंमत सोनवणे, माजी सरपंच रामू भिल, राजेंद्र झाल्टे, ईश्वर सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. आयोजक म्हणून सुशिलाबाई माळी, रमेश माळी, देविदास माळी व वडाळी ग्रामस्थांचे सहकार्य लाभणार आहे.

 

वडाळी ता.शहादा येथील देविदास दाजमल माळी यांना महाशिवरात्रीच्या रात्री त्यांच्या घरात नारळात कानुबाई मातेचा साक्षात्कार झाला असल्याने त्यांनी कानुमाता उत्सव लग्न सोहळा आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. गावकऱ्यांनी एकत्रित येत बैठक घेवून कानुमातेचा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. 

बातमी शेअर करा
Previous Post

महिला लोकशाही दिनाचे 21 मार्च रोजी आयोजन

Next Post

जाम येथे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ ला सुरुवात

Next Post
जाम येथे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ ला सुरुवात

जाम येथे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ ला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दर्जेदार रुग्ण सेवेसाठी सर्वच शासकीय रुग्णालयातील सुविधांचा अभाव दूर करणार : डॉ. हिना गावित

दर्जेदार रुग्ण सेवेसाठी सर्वच शासकीय रुग्णालयातील सुविधांचा अभाव दूर करणार : डॉ. हिना गावित

October 30, 2026
ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add