Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार व नवापूर येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून आंदोलन केल्याप्रकरणी ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
March 15, 2022
in क्राईम
0
बिलगाव येथे महिलेस लाकडाने डोक्यावर मारुन दुखापत, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातील जुनी महानगरपालिका व नवापूर शहरातील सुमाणिक चौकात पूर्व परवानगी न घेता निषेध आंदोलन केल्याप्रकरणी सुमारे ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील जुनी महानगरपालिका चौकात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत कोणतीही पूर्व परवानगी न घेता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी फौ.प्र.स.क. १६० प्रमाणेची नोटीस बजावणी केल्याने त्याच्या निषेधार्थ व कोरोना विषाणू प्रादूर्भाव अनुषंगाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता निषेध आंदोलन केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष विजय चौधरी, राजेंद्र गावित, सपना अग्रवाल, नरेंद्र भिमराव माळी, हर्षल वकील पाटील, लियाकत बागवान, राहूल संतोष चौधरी, भिमसिंग राजपूत, प्रशांत कन्हैय्यालाल चौधरी, संगिता सोनवणे, रत्नदिप अरविंद पाटील यांच्यासह ८ ते १० कार्यकर्त्यांविरोधात नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात १८८, २६८, २६९, २९०, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव करीत आहेत. तसेच नवापूर शहरातील सुमाणिक चौकात पूर्व परवानगी न घेता निषेध आंदोलन केल्याप्रकरणी भरत गावित, एजाज करीमुद्दीन शेख, प्रणव विवेक सोनार, जयंतीलाल अग्रवाल, जाकीर पठाण, अजय गावित, सौरभ भामरे, निलेश प्रजापत व महेंद्र दुसाणे यांच्याविरोधात भादंवि कलम २६८, २६९, २९० सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. विकास पाटील करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील तापमानाचा पारा पुढील काही दिवस अजून वाढणार, ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज

Next Post

वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी १६ मार्च पर्यंत जीपीएस बसविणे बंधनकारक: जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post
नंदूरबार जिल्हयात कोरोना निर्बंधात 50 टक्के मुभा, जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी जाहीर केली नवीन नियमावली

वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी १६ मार्च पर्यंत जीपीएस बसविणे बंधनकारक: जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add