Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

१३ लाख ९५ हजार रुपये किमंतीची बेकायदेशीर विदेशी दारु वाहतुकीवर म्हसावद पोलीसांची धडक कारवाई, दोघांना अटक

team by team
March 13, 2022
in क्राईम
0
१३ लाख ९५ हजार रुपये किमंतीची बेकायदेशीर विदेशी दारु वाहतुकीवर म्हसावद पोलीसांची धडक कारवाई, दोघांना अटक
नंदुरबार |  प्रतिनिधी
म्हसावद ते धडगांव रोडवर उनपदेव फाट्याजवळ १३ लाख ९५ हजार रुपये किमंतीची बेकायदेशीर विदेशी दारु वाहतुकीवर म्हसावद पोलीसांची धडक कारवाई करीत दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि,नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना खात्रीशीर बातमी मिळाली की,दि.१३ मार्च रोजी मध्यरात्री पिंप्री – म्हसावद मार्गे धडगांव येथे एका पांढर्‍या रंगाच्या चारचाकी पिकअप या वाहनामधून अवैध देशी विदेशी दारुची चोरटी वाहतुक होणार आहे . त्या अनुषंगाने  पोलीस अधीक्षक  पी . आर . पाटील यांनी म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  निवृत्ती पवार यांना सदर माहिती कळवुन तात्काळ कारवाई करणेबाबत आदेशीत केले . म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक सुनिल बिर्‍हाडे व पोलीस अमलदारांचे एक पथक तयार केले . म्हसावद पोलीस ठाण्याच्या पथकाने म्हसावद ते धडगांव रोडवर उनपदेव फाट्याजवळ सापळा लावला . साधारणपणे 0.३० वा . सुमारास म्हसावद गावाकडुन धडगांव गावाकडे एक चारचाकी पिकअप वाहन येतांना दिसले म्हणून पथकातील अमंलदारांनी त्यास हाताने व बॅटरीच्या सहाय्याने उभे करण्याचा इशारा देवून वाहन थांबविले . त्यास म्हसावद पोलीसांनी आपली ओळख देवून वाहन चालकास वाहनात काय आहे बाबत विचारपुस करता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली म्हणून म्हसावद पोलीस ठाण्याच्या पथकाला संशय आल्याने त्यांनी वाहनाच्या मागील बाजुची पाहणी केली असता खाकी रंगाचे पृष्ठाचे खोके ठेवलेले मिळुन आले . ते खोके उघडून पाहिले असता त्यामध्ये दारू आढळून आली . ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही इसमांना दारु वाहतुकीचा परवाना आहे काय ? असे विचारले असता त्याचेकडे दारु वाहतुकीचा परवाना नसल्याचे समजले . तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही इसमांना सदरचा माल कोणाकडून आणला ? व कोठे घेऊन जात आहे याबाबत विचारले असता त्यांनी काही एक समाधानकारक उत्तरे दिली नाही . सदर खोके उघडून पाहिले असता त्यात  ८ लाख ७८ हजार ४०० रुपये किमंतीची रॉयल ब्ल्यु माल्ट व्हिस्कीच्या १८० एम.एल.चे एकुण १८३ बॉक्स व त्यामध्ये ८७८४ सिलबंद बाटल्या , १२ हजार ६०० रुपये किमंतीची रॉयल ब्ल्यु माल्ट व्हिस्कीच्या १८० एम . एल . चे एकुण १२६ सिलबंद प्लास्टीकच्या बाटल्या, ४ हजार २९० रुपये किमंतीची बॉम्बे व्हिस्कीच्या १८० एम.एल.चे एकुण ३३ सिलबंद प्लास्टीकच्या बाटल्या, ५ लाख रुपये किमतीचे एक पांढर्‍या रंगाचे े पिकअप वाहन (एम.एच.०४, डि.एस.६४०२) असा नंबर असलेले असा एकुण १३ लाख ९५ हजार २९० रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करुन म्हसावद पोलीस ठाणे येथे  हिमंत रोहिदास पवार रा . बिलगांव ता . धडगांव, खिमजी रमसिया राठोड रा. केलदी किमला पो . बखतगड ता . सांडवा जि . अलिराजपुर मध्य प्रदेश यांच्याविरुध्द् महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन दोन्ही संशयीत आरोपीतांना अटक करण्यात आलेली आहे व गुन्ह्याचा तपास सुरु आहे . सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक  पी . आर . पाटील ,  अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , उप विभागीय पोलीस अधिकारी शहादा  श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार , पोलीस उप निरीक्षक  सुनिल बिर्‍हाडे , असई  गुलाब पावरा , पोलीस हवालदार भिमसिंग ठाकरे , सुनिल बागुल , काशिनाथ साळवे , पोलीस नाईक घनश्याम सुर्यवंशी , सचिन तावडे यांचे पथकाने केली असुन पोलीस अधीक्षक  पी . आर . पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे .
बातमी शेअर करा
Previous Post

भाजपा तळोदा ग्रामीण व शहर मंडल संघटनतर्फे विरोधी पक्ष नेते यांना देण्यात आलेल्या नोटीसचे करण्यात आले दहन

Next Post

नवापूर शहरातील नागरीकांच्या जीवाशी खेळणार्‍या पालिकेची चौकशी करावी : भाजप तालुक्याध्यक्ष भरत गावीत

Next Post
नवापूर शहरातील नागरीकांच्या जीवाशी खेळणार्‍या  पालिकेची चौकशी करावी : भाजप तालुक्याध्यक्ष भरत गावीत

नवापूर शहरातील नागरीकांच्या जीवाशी खेळणार्‍या पालिकेची चौकशी करावी : भाजप तालुक्याध्यक्ष भरत गावीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add