नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते तथा भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महाविकास आघाडीचे कटकारस्थान, षडयंत्र उघडकीस आणल्याने राजकीय द्वेषापोटी देवेंद्र फडणवीस यांना महाविकास आघाडीच्या सरकारने कलम 160 प्रमाणे पोलिसांमार्फत नोटीस बजावली आहे. याच्या निषेधार्थ आज नवापुर शहरातील सुमाणिक चौक येथे भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली नोटीस दहन आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी आंदोलन करतांना भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख,शहर अध्यक्ष प्रणव सोनार, नगरसेवक महेंद्र दुसाने, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश सदस्य जाकीर पठाण, तालुका सरचिटणीस जयंतीलाल अग्रवाल, शहर सरचिटणीस अजय गावित, शहर सरचिटणीस सौरव भामरे, सोशल मीडिया प्रदेश सदस्य निलेश प्रजापत, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा सचिव तौसिफ मन्सूरी, सज्जद बदुडा, आदी पदाधिकारी उपस्थित होते.