नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते तथा भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे कटकारस्थान, षड्यंत्र उघडकीस आणल्याने राजकीय द्वेषापोटी देवेंद्र फडणवीस साहेब यांना महाविकास आघाडीच्या सरकारने कलम 160 प्रमाणे पोलिसांमार्फत नोटीस दिली आहे. याच्या निषेधार्थ आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर, जुनी नगरपालिका चौक येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नोटीस दहन आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी आंदोलन प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेंद्र गावित, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सपना अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष संगीता सोनवणे, जिल्हा कोषाध्यक्ष कमल ठाकूर, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत बागवान, अनुसूचित जाति मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष वसईकर, सहकार सेल जिल्हाध्यक्ष भीमसिंग राजपूत, नगरसेवक प्रशांत चौधरी, लक्ष्मण माळी, ट्रान्सपोर्ट सेल जिल्हाध्यक्ष विनम्र शहा, भटके-विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष संजय साठे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बुधाभाई पाटील, ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रकाश गवळे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राहुल चौधरी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, आदिवासी मोर्चा शहर अध्यक्ष विजय नाईक, अल्पसंख्यांक मोर्चा शहराध्यक्ष समीर मंसूरी, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र लाहोटी, उद्योग आघाडी शहराध्यक्ष रमण दुसेजा, सहकार सेल शहराध्यक्ष रत्नदीप पाटील आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.