Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

निपुण भारत अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण उत्साहात

team by team
March 13, 2022
in शैक्षणिक
0
निपुण भारत अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण उत्साहात

नंदुरबार l प्रतिनिधी
निपुण भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय अध्ययन स्तर निश्चितीबाबत प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथे नुकतेच संपन्न झाले.
जिल्हा सुकाणू समिती व जिल्हा प्रकल्प नियंत्रण कक्ष यांच्या सभेतील दिलेल्या निर्देशानुसार माननीय जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी श्रीमती मीनल करनवाल , मैनक घोष यांच्या आदेशानुसार जिल्हास्तरीय अध्ययन स्तर निश्चिती बाबत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर व शिक्षणाधिकारी प्राथमिक सतीश चौधरी यांच्या मार्गदर्शनातून सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रातील एक शिक्षक असे 95 शिक्षकांचे व तालुकास्तरीय विषय साधन व्यक्ती यांचे प्रशिक्षण संपन्न झाले. प्रशिक्षणाचे औपचारिक उद्घाटन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.जगराम भटकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. डॉ. जगराम भटकर यांनी प्रशिक्षणार्थ्यांना सूचित केले की, आपण सुलभक म्हणून केंद्र स्तरावर कार्य करीत असतांना शिक्षकांना या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून दिल पाहिजे , कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता वस्तुनिष्ठपणे विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चिती करून कोविड नंतरच्या परिस्थितीवर आधारित सद्यस्थिती जाणून घेण्याच्या हेतूने अध्ययन स्तर करणे अपेक्षित आहे. या अध्ययन स्तराच्या संख्यात्मक माहितीवर आधारित कृती कार्यक्रमाचे पथदर्शक स्वरूपात जिल्ह्यात राबवणूक केली जाईल, त्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षापासून पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाच्या गुणात्मक वाढीसाठी कृती कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्ह्यातील सर्व शाळांवर केली जाईल. तसेच या प्रशिक्षणात सहायक प्रकल्प अधिकारी निर्मल माळी यांनी आदिवासी विकास विभागातील नंदुरबार प्रकल्पात राबविण्यात येत असलेल्या भविष्यवेधी शिक्षण विचार अनुभवासह मांडले. सदर प्रशिक्षणासाठी अध्ययन स्तर निश्चिती बाबत भाषा व गणित विषयाच्या अध्ययन स्तर निश्चितीचे टप्पे व आवश्यक ती कार्यवाही सुलभक प्रथम संस्थेचे सुधीर कोटंगळे यांनी सविस्तर रीत्या प्रात्यक्षिकासह सादर केली. सदर प्रशिक्षणाचे समन्वयक वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी यांनी शिक्षकांना अध्ययन स्तर निश्चिती बाबत सविस्तर मार्गदर्शन करून या प्रशिक्षणाचे महत्व विविध उदाहरणांद्वारे पटवून दिले, यात विद्यार्थ्यांचे वस्तुनिष्ठपणे अध्ययन स्तर, त्यानंतर विद्यार्थ्यांचे योग्य स्तरावर मुलनिहाय नियोजन करुन कृती कार्यक्रम योग्यरीत्या राबविला तर प्रभावीपणे गुणात्मक वाढ होताना दिसून येण्याचा आशावाद निर्माण केला.सदर प्रशिक्षणास सुलभक म्हणून प्रथम संस्थेचे सुधीर कोटंगळे , गणेश पाटील,प्रमोद मुगल हे उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या उद्घाटन व समारोप कार्यक्रमास अधिव्याख्याता डॉ.वनमाला पवार, डॉ.संदीप मुळे उपस्थित होते. प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन व आभार अधिव्याख्याता सुभाष वसावे यांनी केले. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील साधन व्यक्ती यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

घोटाणे येथून मोबाईलसह दुचाकी लंपास, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

अनामिका चौधरी यांना “कस्तुरी गौरव पुरस्कार”

Next Post
अनामिका चौधरी यांना “कस्तुरी गौरव पुरस्कार”

अनामिका चौधरी यांना "कस्तुरी गौरव पुरस्कार"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add