Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

‘दुष्टचक्र’ कथासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे जि.प.अध्यक्षा ॲड. सिमा वळवी यांच्या हस्ते प्रकाशन

team by team
March 13, 2022
in शैक्षणिक
0
‘दुष्टचक्र’ कथासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे जि.प.अध्यक्षा ॲड. सिमा वळवी यांच्या हस्ते प्रकाशन

नंदूरबार l प्रतिनिधी
जागतिक महिला दिनी जिल्हा परिषद नंदुरबार च्या अध्यक्षा ॲडव.सिमा वळवी यांच्या हस्ते वृषाली नरेंद्र खैरनार लिखित ‘दुष्टचक्र’ या कथासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. यावेळी उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी, गणेश पराडके, निर्मला राऊत, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ , प्रविण पवार हे मान्यवर उपस्थित होते.
धडगाव, नवापूर सारख्या आदिवासी भागात अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या वैशाली पाटील ऊर्फ वृषाली नरेंद्र खैरनार ह्या आदिवासी स्त्रीयांच्या समस्या जाणून समुपदेशकाच्या भूमिकेतून काम करीत आहेत. अशावेळी आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांना कथेचे स्वरुप देत त्यांनी या संग्रहाची निर्मिती केली आहे. यासोबतच वृषाली खैरनार ह्या मराठी व अहिराणी भाषेतून उत्तम कथाकथन करतात. यापूर्वी धुळे व जळगाव आकाशवाणी केंद्रावरून ‘दुष्टचक्र’ कथासंग्रहातील बहुतांश कथांचे प्रसारण झालेले आहे.
डिसेंबर २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अनुदानातून प्रकाशित झालेल्या या कथासंग्रहाच्या पहिल्या आवृत्तीला भरभरून प्रतिसाद लाभला. त्याविषयी गौरव करताना प्रकल्प अधिकारी रणजित कु-हे म्हणाले, ‘नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण स्त्रीयांच्या समस्यांना अधोरेखित करण्याचे काम या संग्रहातील कथांनी केले आहे.’ अं.पर्यवेक्षिका संघटनेच्या धडाडीच्या कार्यकर्त्या चैताली आव्हाड यांनी कथासंग्रहा विषयी कौतुक करीत सर्व पर्यवेक्षिकांच्या उपस्थितीत वृषाली खैरनार यांना सन्मानित केले.
महिला व बालविकास प्रकल्पाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला नंदुरबार जिल्ह्यातील प्रकल्प अधिकारी संजय कोंडार, मोलाणे, कमलेश महाले, निलिमा मंडपे व अं.सेविका, जि.प.चे कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

महावितरणच्या कृषी धोरणाचा लाभ घेत जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने १५ लाखांचे वीजबिल भरून मिळवला थकबाकीमुक्तीचा मान

Next Post

प्रकाशा-नंदुरबार रस्त्यावर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Next Post
बिलगाव येथे महिलेस लाकडाने डोक्यावर मारुन दुखापत, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

प्रकाशा-नंदुरबार रस्त्यावर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add