नंदुरबार ! प्रतिनिधी
तंबाखू ,धूम्रपान ची सवय ही विविध कॅन्सर तसेच इतर जीवघेण्या असंसर्गजन्य रोगांना आमंत्रण देते. त्याबाबत सामाजिक जनजागृती व भावी पिढी ला या व्यसनापासून रोखण्या चे कार्य राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष करत आहे.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समिती अभिजित राऊत यांचे विशेष मार्गदर्शन खाली व जिल्हा शल्यचिकित्सक तथा सदस्य सचिव, जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समिती डॉ.एन. एस.चव्हाण यांचे विशेष देखरेख खाली जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्ह्यात कार्यरत असून, तंबाखू मुक्त शाळा, तंबाखू मुक्त कार्यालय, जनजागृती व प्रशिक्षण असे विविध उपक्रम जिल्ह्यात राबविले जातात. या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांची दखल तंबाखू नियंत्रण कक्ष मार्फत घेतली जाते.
तंबाखू मुळे तोंडाचा कॅन्सर झाला व आपला तोंडाचा एक भाग कापला गेला ते दुसऱ्या ला वहायला नको म्हणून आपले पुढचे आयुष्य तंबाखू गुटखा च्या सवीय मुळे होणारे आजार विषयी लोकांमधे जनजागृती व्हावी व व्यसनग्रस्त लोक या जीवघेण्या आजारा पासून वाचावे म्हणून आपले बोनस आयुष्य समर्पित करणारे राज मोहम्मद खान शिकलगर हे गेल्या 9 वर्षा पासून जिल्ह्यात कसोशीने तंबाखू मुक्तीची मोहीम राबवित आहेत. त्यांच्या या कार्याची दखल जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष घेतली व त्यांची तंबाखू मुक्त अभियान व तंबाखू मुक्त शाळा अभियान साठी जळगाव जिल्हा ब्रॅण्ड ऐम्बसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती चे पत्र जिल्हा शल्यचिकित्सक तथा सदस्य सचिव ,जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समिती डॉ. एन. एस. चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या वेळी बोलताना डॉ.चव्हाण यांनी राज मोहम्मद खान शिकलगर यांचे कार्याची प्रशंसा केली व येथून पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या. या वेळी जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष चे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.तसेच नंदुरबारच्या
दो शाह तकिया ब्लड फाउंडेशन नंदुरबार चे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष:- महा एन जी ओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत (महा एन जी ओ समिती, नंदुरबार) चे आकीब धोबी यांनी शुभेच्छा दिल्या.