नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील राजबर्डी येथे प्रधान मंत्री आवास योजना अंतर्गत ( आवास प्लस प्रपत्र ड ) लाभार्थ्यांना प्राधान्य क्रम घरकुलाचा लाभ मिळावा.यासाठी प्रतिक्षा यादी तयार करन्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्यात आली.
धडगाव तालुक्यातील राजबर्डी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत दि. 11 मार्च रोजी सकाळी 11 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र राजबर्डी येथे प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण ( आवास प्लस प्रपत्र ड ) प्राधान्य क्रम घरकुल लाभासाठी प्रतिक्षा यादी तयार करन्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजना ही देशातील गरजू व गरीब नागरीकांन साठी राबवण्यात येते. यात घर नसलेल्या कुटुंबाला निवारा दिला जात असतो. ही योजना केंद्र सरकार तथा राज्य सरकार असे दोघं मिळून मिळून राबवत असतात.
या ग्रामसभेत अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नागरिक माधव फेरेंग्या पावरा होते.यावेळी कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती धडगाव सी.डी.राठोड उपस्थित होते. यावेळी ग्रामविकास अधिकारी आतिष रणछोड चव्हाण यांनी सभेत घरकुल लाभार्थ्यांनी लागणारे निकष वाचून दाखवले. यावेळी राजबर्डी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.