Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे बिऱ्हाड मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला,रात्री मोर्चेकऱ्यांचा ठोकला मुक्काम

team by team
March 10, 2022
in सामाजिक
0
सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे बिऱ्हाड मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला,रात्री मोर्चेकऱ्यांचा ठोकला मुक्काम

नंदुरबार | प्रतिनिधी

सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेतर्फे नंदुरबार जिल्ह्यातील वन हक्क दावेदारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथून ५० किलोमीटर लांब अंतर पार करीत निघालेला पायी बिर्‍हाड काल जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.या मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सायकांळी उशीरा पर्यंत जिल्हाधिकार्‍यांशी अडीच तास चर्चा सुरू होती.त्यानंतर लेखी आश्वासन न मिळाल्याने मोर्चेकऱ्यांनी त्या ठिकाणी मुक्काम ठोकला.


सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेतर्फे जिल्ह्यातील वन हक्क दावेदारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी काल नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथून ५० किलोमीटर लांब अंतर पार करीत जवळपास पाच हजार पेक्षा अधिक वन हक्क दावेदार शेतकरीआपल्या डोक्यावर आपलं बिर्‍हाड घेऊन नंदुरबार शहरात सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास दाखल झाले होते.त्यानंतर शहरातील सुभाष चौकात सभा झाली त्यानंतर दुपारी २.३० वाजेच्या सुमारास हा मार्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचला.यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना मोर्चाकर्‍यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.या निवेदनात म्हटले आहे कि, गेल्या १५ वर्षापासून वन हक्क कायद्याची योग्य रीतीने अंमलबजावणी झालेली नाही गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळात कोरोनाचा धाक दाखवून घरात कोंडून सर्वात जास्त वन हक्क दावेदारांचे निकाल अपात्र ठरवले आहे. जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी चर्चेला ही वेळ देत नसल्याने संतप्त शेतकर्‍यांनी बिर्‍हाड मोर्चा काढला आहे.नवापूर तालुक्यातील प्रस्तावीत एम.आय.डि.सी भूअधिग्रहण ताबडतोब थांबवा,वनखाते बेकायदेशीर पणे आदिवासीनवर खोट्या केसेस करत आहेत ताबडतोब थांबूवन संबंधित अधिकार्‍यांवर फोजदारी गुन्हा दाखल करा, मंजूर वनपट्टा धारक शेतकर्‍याना वीज कनेक्शन, बँक कर्ज, सह सर्व योजनेचा लाभ द्या, आदिवासी ना दिलेल्या प्रमापत्रात अनेक त्रूटया आहेत उदा. कम्प न. चुकीचा, क्षेत्र कमी, नाव चुकीचं, नावे समाविष्ट करणे ती चुकीची प्रमाणपत्रे ताबडतोब दुरुस्ती करा, कोरोना काळात उपविभागीय व जिल्हास्तरिय समितीने वनखात्याच्या चुकीचा अभिप्राय व चुकीच्या सल्ल्या नुसार २००५ पूर्वीच्या वनजमीन कसत असलेल्या वनहक्क दावेदाराना नोटीसा काढत आदिवासीना जमिनीतून बेदखल करण्याचा कट रचला जात आहें त्या चुकीच्या नोटीसा परत घ्या व आदिवासीना सातबारा उतारा द्या,देशव्यापी सर्व पिकासाठी हमीभाव गॅरंटी कायदा करा,आदिवासीना वनवासी म्हणार्‍यांवर कारवाई करा, महामानवाची बदनामी करणार्‍या राज्यपालचा निषेध, बोगस आदिवासीना विरोध,आदिवासींचे पाणी, रेशन, शिक्षण, आरक्षण, यासह अनेक मागण्या केल्या त्यानंतर मोर्चाकर्‍यांशीर जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी बैठक घेतली यात सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभा यांच्या वतीने कॉम्रेड.रामसिंग गावीत, किशोर ढमाले, होमाबाई गावीत, लिलाताई वळवी, शीतल गावीत गेवाबाई गावीत,आर टी गावीत, रणजित गावीत दिलीप गावीत, जगन गावीत, शिंगा वळवी, विक्रम गावित आदी उपस्थीत होते.यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.सायकांळी उशीरा पर्यंत जिल्हाधिकार्‍यांशी अडीच तास चर्चा सुरू होती.त्यानंतर लेखी आश्वासन न मिळाल्याने मोर्चेकऱ्यांनी त्या ठिकाणी मुक्काम ठोकला.

बातमी शेअर करा
Previous Post

थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ परिसरात बेमोसमी पावसाची हजेरी

Next Post

म्हसावद वीज केंद्रावरील भार कमी, आ. राजेश पाडवींच्या प्रयत्नाला यश

Next Post
म्हसावद वीज केंद्रावरील भार कमी, आ. राजेश पाडवींच्या प्रयत्नाला यश

म्हसावद वीज केंद्रावरील भार कमी, आ. राजेश पाडवींच्या प्रयत्नाला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add