तळोदा | प्रतिनिधी
तळोदा येथे शिवसेनेतर्फे शिव संपर्क अभियान अंतर्गत आयोजित कार्यक्रमात तळोदा येथील ९५१ कुटुंबियांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
शिवसंपर्क अभियान अंतर्गत संसारोपयोगी साहित्य व तळोदा येथील माजी सैनिकांचा सत्कार सोहळा कार्यक्रम तळोदा येथील माळी समाज मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाध्यक्ष आमश्या पाडवी, जिल्हाध्यक्ष विक्रांत मोरे, माजी जिल्हा प्रमुख दिपक गवते, अरुण चौधरी, नगरसेविका प्रतिक्षा दुबे, माजी नगरसेविका कोमल सोनार, शिवसेना जिल्हा संघटक श्याम वाडीले, माजी उपनगराध्यक्ष गौतम जैन, उपप्रमुख रविंद्र गिरासे, प्रकाश कुलकर्णी, रूपसिंग पाडवी, आकाश वळवी, संजय पटेल, अर्जुन मराठे, माळी समाज पंच अध्यक्ष अरविंद मगरे, मराठा समाज मंडळाचे अध्यक्ष नवनीत शिंदे, गुजर समाज पंच अध्यक्ष संजय पटेल, गुरव समाज अध्यक्ष बाबूलाल गुरव, वाणी समाज अध्यक्ष विजय वाणी, बोहरी समाज अध्यक्ष मुर्तुझा बोहरी, भोई समाज अध्यक्ष पिंटू भोई, शिंपी समाज अध्यक्ष सुपडू भांडारकर, सोनार समाज अध्यक्ष घनश्याम सोनार, सराफ असोसिएशनचे प्रसाद सराफ, जोहरी समाज अध्यक्ष प्रकाश जोहरी, कुंभार समाज अध्यक्ष रविंद्र कुंभार, साळी समाजाचे अध्यक्ष राजेंद्र साळी, धोबी समाजाचे अध्यक्ष कैलास धोबी, नाभिक समाज अध्यक्ष उमेश ठाकरे, ब्राह्मण समाज अध्यक्ष गिरीष अग्निहोत्री, मुस्लिम समाज पंच आसिफ शेख, मौलाना शोएब रजा नुरी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, कोरोना काळात शिवसैनिक निस्वार्थपणे धावून आले. स्वातंत्र्य सैनिकांची आठवण केवळ युद्ध काळात येते मात्र शिवसैनिकांनी त्यांची आठवण केली. गरिबांना संसारपयोगी साहित्य वाटप करणारा पक्ष मुख्यमंत्र्यांचा आहे. तसेच लसीकरण वाढविण्यासाठी सर्वच समाजाने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून तळोदा शहरातील माजी सैनिक गोरख कलाल, रुपसिंग पाडवी, राजेंद्र धोंडू माळी, उदय सूर्यवंशी यांच्या सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष आमश्या पाडवी, विक्रांत मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान कोकणातील तळई येथे दरळ कोसळून मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी आनंद सोनार, विपुल कुलकर्णी, विनोद वंजारी, कल्पेश सूर्यवंशी, श्रावण तिजविज आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश मराठे यांनी केले. तर प्रास्ताविक व आभार जितेंद्र दुबे यांनी मानले.