Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे ‘नारी-शक्ती’ निधार महिला मेळावा साजरा

team by team
March 8, 2022
in सामाजिक
0
नंदूरबार येथे ‘नारी-शक्ती’ निधार महिला मेळावा साजरा

नंदुरबार l प्रतिनिधी
येथील डॉ.तेजल विशाल चौधरी यांच्या आयोजनाखाली गेल्या ७ वर्षापासून नंदुरबार येथे सर्व सामाजिक संस्था, समाज मंडळ व विविध महिला मंडळी एकत्र येऊन महिला दिन साजरा करतात. यावर्षी महिला दिनानिमित्त विविध समाज व मंडळाच्या महिलांची स्कुटर रॅली आयोजित करण्यात आली होती. तसेच शहरातील विविध चौकात स्त्री शक्ती तसेच स्त्रीयांद्वारे विविध प्रात्यक्षिके व नृत्य प्रकारही सादर करण्यात आले.


रॅलीला काका-का-ढाबा येथील डॉ.तेजल चौधरी यांच्या निवासस्थानापासून सुरुवात झाली. रॅलीचे औपचारिक उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, प्रांत श्रीमती मीनल करनवाल, डॉ.तेजल चौधरी यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस अधीक्षक श्री.पाटील यांनी उपस्थितीत महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी येथील चौकात आदिवासी संस्कृती दाखविणारा आदिवासी नृत्य प्रकार महिलांनी सादर केला. नंतर रॅली ब्राम्हण महिलांद्वारे सजविलेल्या परशुराम चौकात राजस्थानी ब्राम्हण संस्कृती देखावा होता. नंतर शहीद संत कवलराम साहेब चौकात सिंधी सोशल महिला गृपतर्फे झुलेलाल भगवान प्रतिमा पुजन झाले. सरदार वल्लभभाई प्रवेशद्वाराजवळ रॅलीचे स्वागत गुजर महिलांना वृक्ष भेट देवून केले. नंतर रॅली उड्डाणपुलापासून महात्मा गांधींना नमन करुन सोनार खुंट-जळका बाजार येथे बुरहानी वुमन गृप नंदुरबारकडून सर्व महिलांना मिठाई वाटप व त्यांच्या मशिदमध्ये संस्कृती दर्शन सोहळा आयोजित केला होता. तेथून रॅली मोठा मारुती मंदिर-अंधारे चौक व जुनी नगरपालिका येथे ग्लोरीयस वुमन डान्स गृपकडून सर्व प्रकारचे ऐतिहासिक महिलांवर देशभक्तीपर नृत्य सादर करण्यात आले. नंतर रॅली नेहरु चौकात येऊन तेथे नाभिक समाज व श्रॉफ हायस्कुलकडून पथनाट्य व लहान मुलींचे नृत्य सादर करण्यात आले. तसेच प्यारीबाई ओसवाल शाळेतील मुलींनी अहिल्याबाई होळकर, सिंधुताई सपकाळ, इंदिरा गांधी, किरण बेदी, मदर टेरेसा, लता मंगेशकर इत्यादी महिलांची वेशभूषा करुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर नंदुरबार जिल्हा तायक्वांदो असोसिएशनकडून महिला स्वयंसिद्धा कराटेचे प्रात्यक्षिके करण्यात आली आहे.
सर्व महिलांनी व शहरातील नागरीकांनी विविध कार्यक्रमांचा आनंद घेतला. यावेळी सर्व महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. प्रत्येक समाज महिला त्या आपापल्या समाजाच्या पारंपारिक वेशभूषा करुन सहभागी झाल्या. प्रत्येक महिला उपजतच सौंदर्याचं लेणं घेऊन आलेली असते. ते सौंदर्य तिच्या कार्याचे असते. तसेच तिच्यातल्या सुप्त गुणांचे असते. हेच सौंदर्य प्रत्येकीने खुलवावे व आपल्या गुणांना वाव द्यावा, हाच हेतू सर्वांनी साध्य केला.
रॅलीची समाप्ती महिलांनी हळदी-कुंकू व वाण वाटप करुन माहेश्‍वरी महिला मंडळ व सौ.मनिषा जैन कांकरीया यांनी केली. तसेच रोटरी क्लब नंदनगरीकडून सर्व महिलांना नेहरु चौकात थंड पेयाचे वाटप करण्यात आले.
सदर रॅलीचे आयोजन लायन्स फेमिना, लायनेस क्लब, जैन सोशल प्लॅटीयम गृप, राजस्थानी ब्राम्हण, बुर्‍हानी वुमन, राष्ट्रीय सेविका समिती, सिंधी सोशल, गुजर महिला मंडळ, नाभिम समाज, तेली समाज, माहेश्‍वरी समाज, सोनार समाज, ब्राम्हण समाज, गुजराथी समाज महिला मंडळ, याहामोगी माता महिला मंडळ, संत रविदास महिला संघ सहभागी झाले होते, अशी माहिती आयोजिका डॉ.तेजल चौधरी,हिना रघुवंशी व सुप्रिया कोतवाल यांनी दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

नदी जोड प्रकल्प अंतर्गत 14 कोटी 70 लाखांचा निधी आणला खेचून,राष्ट्रवादीचे नेते संदीप बेडसे यांची आणखी एक मोठी कामगिरी

Next Post

बचत गटांनी कर्जाच्या रकमेतुन स्वयंरोजगार उभारावा;माजी आ चंद्रकांत रघुवंशी

Next Post
बचत गटांनी कर्जाच्या रकमेतुन स्वयंरोजगार उभारावा;माजी आ चंद्रकांत रघुवंशी

बचत गटांनी कर्जाच्या रकमेतुन स्वयंरोजगार उभारावा;माजी आ चंद्रकांत रघुवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add