Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बचत गटांनी कर्जाच्या रकमेतुन स्वयंरोजगार उभारावा;माजी आ चंद्रकांत रघुवंशी

team by team
March 8, 2022
in राजकीय
0
बचत गटांनी कर्जाच्या रकमेतुन स्वयंरोजगार उभारावा;माजी आ चंद्रकांत रघुवंशी

नंदुरबार l प्रतिनिधी
कुटुंबाच्या अडचणीच्या काळात घरातील स्त्रीच कामात येत असते. नगरपरिषदेच्या माध्यमातून गेल्या २० वर्षापासून सातत्याने बचत गटांना योजनांतून मदत करण्यात येत आहे.पालिकेच्या पैसा हा जनतेचा पैसा असून,बचत गटांनी घेतलेलं कर्ज वेळेवर फेडावं.बचत गटांनी कर्जाच्या रकमेतून स्वयंरोजगार उभारावा असे आवाहन शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
जागतिक महिला दिवस निमित्त नगरपरिषदेतर्फे बचत गटांच्या महिला मेळावा व दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानांतर्गत शिवणकामाचे प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांना डिजिटल शिवन मशीनचे वाटप करण्यात आले.त्या वेळी रघुवंशी बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी चेन्नई येथे असल्यामुळे ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून त्यांनी महिला दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, नगरपालिकेकडून ज्या महिलांनी शिवणकामाचे प्रशिक्षण घेतलं असेल त्यांना शिवण मशिन देण्यात येईल. कुटुंबाच्या अडचणीच्या काळात घरातील स्त्रीच कामात येत असते त्यामुळे समाज तिच्या आदर करतो. माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांनी महिलांना राजकीय आरक्षण दिलं तर राज्य सरकारने महिलांना सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी ५० टक्के वाटा मिळवून देत कायदा केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रमुख अतिथी सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करणवाल व तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी उपस्थित बचत गटांच्या महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानांतर्गत शिवणकामाचे प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांना डिजिटल शिवन मशीनचे वाटप व प्रमाणपत्र तसेच महिला बचत गटांना नगरपरिषदेच्या माध्यमातून मंजूर कर्ज आदेशाचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रभारी नगराध्यक्ष कुणाल वसावे, महिला व बालकल्याण सभापती मंगलाबाई माळी, आरोग्य सभापती मेमन मेहरुन्निसा अ.गनी, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, शिक्षण सभापती राकेश हासानी, नगरसेविका सोनिया राजपूत, भारती राजपूत,मनिषा वळवी,ज्योती पाटील, भावना गुरव, नंदा जाधव, कल्याणी मराठे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानसी मराठे तर सूत्रसंचालन प्राध्यापक माधव कदम यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे ‘नारी-शक्ती’ निधार महिला मेळावा साजरा

Next Post

स्त्री ने स्वत्वाचा शोध घ्यावा : चांदणी सपकाळे, ज.ग.नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात महिलादिन साजरा

Next Post
स्त्री ने स्वत्वाचा शोध घ्यावा : चांदणी सपकाळे, ज.ग.नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात महिलादिन साजरा

स्त्री ने स्वत्वाचा शोध घ्यावा : चांदणी सपकाळे, ज.ग.नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात महिलादिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add