नवापूर l प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील विसरवाडी येथील सार्वजनिक कला व वाणिज्य महाविद्यालयातील तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी संगीता तेड्या गावित रा. मोठे कडवान ह्या राजस्थान राज्यातील आय.आय.एस विद्यापीठ जयपूर येथे दिनांक 8 ते 12 मार्च 2022 पर्यंत होणाऱ्या राष्ट्रीय स्तरीय आंतरविद्यापीठ हॅण्डबॉल स्पर्धेसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे प्रतिनिधित्व करण्यासाठी विसरवाडी येथून रवाना झाले. नंदुरबार, धुळे व जळगाव आदी जिल्ह्यातील महाविद्यालयातून 12 सदस्य असलेल्या महिला हॅण्डबॉल संघात केवळ एक मात्र कुमारी संगीता तेड्या गावित रा. मोठे कडवान ह्या आदिवासी विद्यार्थिनीची उमवि जळगाव विद्यापीठीय संघात निवड झाल्याने संस्थेचे अध्यक्ष भरत गावित यांच्या कडून तिचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले, तसेच सदर विद्यार्थिनीस हॅण्डबॉल खेळात सहभागी होण्यासाठी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉक्टर राहुल ठाकूर यांना भरत गावित यांनी सूचना करून विद्यार्थीनीला आवश्यक साहित्य खरेदी करून देण्यासाठी आर्थिक सहाय्यता केली.








