अक्कलकुवा l प्रतिनिधी
आदिवासींचा ऐतिहासिक वारसा जपणारे व संस्कृती दर्शविणारे चित्रे डाब येथील देवगोई याहा मोगी मंदिराजवळून जाताना आकर्षक ठरत आहे. आदिवासी संस्कृतीचा ठेवा जपणाऱ्या या चित्रांचे लोकार्पण खासदार डॉ.हिना गावित व जिप अध्यक्षा सीमा वळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
अक्कलकुवा तालुक्यातील डाब येथील देवगोई घाट येथे काढण्यात आलेले चित्र हे आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवत असून सध्या सर्वांचे आकर्षण बनले आहे. ग्रामपंचायतीचा मार्फत पेंटर कांतीलाल पाडवी यांनी हे चित्रे रेखाटली आहेत. महाशिवरात्री निमित्त जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड.सीमा पद्माकर वळवी, खासदार डॉ. हिना गावित, मा.मंत्री ॲड.पद्माकर वळवी, माजी मंत्री तथा आमदार विजयकुमार गावीत यांच्या प्रमुख उपस्थितीत या पैंटिंगचे लोकार्पण करण्यात आले. त्यांनी जवळ येऊन या चित्राची पाहणी करत चित्र रेखाटणारे कांतिलाल पाडवी यांचे कौतुक केले. प्रशासक वाय. डी पवार- व ग्रामसेविका निशा पाडवी यांनी मांडलेला संकल्पना या चित्रकाराने अतिशय सुबक पद्धतीने भिंतींवर उतरवल्यामुळे ग्रामसेविका निशा पाडवी हीचे देखील कौतुक होत आहे.
या लोकार्पण सोहळा प्रसंगी जि. प. सदस्य, सी.के पाडवी,जि. प. सदस्य, सुहास नाईक, जि.प सदस्य सुप्रिया गावित, शांतिकर वसावा, भिमसिंग वळवी, डॉ.शांतिकर वसावा, मोल होबाय पुस्तक लेखक जितू दादा, चित्रकार कांतीलाल पाडवी राणीपुर पंचायत समिती सदस्य मेलदीबाई अमृत वळवी, राजेश पाडवी शिवरात्री निमित्त देवगोई/डाब येथे देवमोगरा मातेचे यात्रेत येणारे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान यावेळी अध्यक्षा सीमा वळवी यांनी ग्रामपंचायती मार्फत होत असलेल्या कामे पाहून समाधान व्यक्त केले.