Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

होय विजुभाऊ मीच चंद्रकांत रघुवंशींना वसुली विभागाचा बैठकीला सन्मानपूर्वक आमंत्रित केले : प्रभारी नगराध्यक्ष कुणाल वसावे

team by team
March 2, 2022
in राजकीय
0
होय विजुभाऊ मीच चंद्रकांत रघुवंशींना वसुली विभागाचा बैठकीला सन्मानपूर्वक आमंत्रित केले :  प्रभारी नगराध्यक्ष कुणाल वसावे

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार पालिकेत करवसूली संदर्भात आयोजित बैठकीत मा. आ. चंद्रकांत रघुवंशी यांना नेमक्या कोणत्या अधिकाराने निमंत्रित केले असा प्रश्न भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.त्याला प्रत्युत्तर म्हणून प्रभारी नगराध्यक्ष कुणाल वसावे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये उत्तर दिले.
या पत्रकात म्हटले आहे की, होय विजुभाऊ मीच चंद्रकांत रघुवंशींना वसुली विभागाचा बैठकीला सन्मानपूर्वक आमंत्रित केले होते . होय मीच प्रभारी मुख्याधिकारी श्री . थोरात यांना सुध्दा वसुली विभागाचा मिंटीगमध्ये येण्यासंदर्भात सूचित केले होते . चंद्रकांत रघुवंशींच्या नेतृत्वाखालीच आम्ही नंदुरबार नगरपरिषदेत प्रचंड बहुमतांनी विजयी झालो . आमच्या नेत्याचा नेतृत्वातच आम्ही आपला पराभव करू शकलो , नंदुरबार नगरपरिषदेच्या माध्यमातून होणाच्या सगळया चांगल्या वाईट कामांची जबाबदारी सुध्दा आमचीच आहे याची आम्हाला जाणीव आहे . नंदुरबार नगरपरिषदेने जर घरपट्टी व पाणीपट्टी वसुल केली नाही तर भविष्यात अनुदान सुध्दा नगरपरिषदेला शासनाकडून मिळणार नाही आणि यामुळे आम्ही वसुली संदर्भात बैठक घेतली होती व आमचे नेते मा . आ . चंद्रकांत रघुवंशी यांना सुध्दा आमंत्रीत केले होते . नंदुरबार नगरपरिषदेची यावर्षी निवडणूक असल्याने तुम्ही जनतेची दिशाभूल करून विकासकामांमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करीत आहात , याची सुध्दा जनतेला कल्पना आहेच , तुम्ही यापूर्वी सुध्दा घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी मागणी केली होती . त्यावेळेस सुध्दा आमचे नेते चंदुभैय्या यांनी आपल्याला आव्हान केले होती की , भारतीय जनता पक्षाच्याखालील काम करत असलेल्या किंवा महाराष्ट्रतील कुठल्याही नगरपरिषदेने घरपट्टी व पाणीपट्टी माफ केलेली असेल तर तुम्ही आम्हाला कळवा , त्या नगरपरिषदेला आपण सर्व मिळून भेट देऊ व त्या नगरपरिषदे प्रमाणे आपणही आपल्या जनतेला न्याय देऊ . परंतु ते आव्हान तर आपण स्वीकारले नाहीच परंतु आपण चंदुभैय्यांचा उपस्थितीवर प्रश्न विचारले , आपण हे विसरलात की फक्त आणि फक्त एकच वर्ष नंदुरबार नगरपरिषदेची सत्ता आपल्या ताब्यात होती व त्यातही श्री . हिरालाल काका , सौ . इंदू काकु यांच्या शेजारी बसुन नगरपालिका घालवीत होते . हे आपण विसरलात नगरपरिषद सर्वसाधारण सभेत सुध्दा काकासाहेब उपस्थित राहायचे , परंतु आमचे नेते चंदुभैय्या आजपर्यंत आमच्यावर विश्वास असल्याने नगरपरिषदेमध्ये किंवा सर्वसाधारण सभेमध्ये कधीच आले नाहीत . परंतु त्यांच्या मार्गदर्शनाखालीच नंदनगरीचा जनतेला न्याय देण्याचे काम तसेच शहराचा सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत . कृपया जनतेचा गैरसमज करायचे थांबवा विकासचे वाटेकरी व्हा ! एवढीच मी आपल्याला विनंती करतो . प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी सुध्दा प्र . नगराध्यक्षांचा घेतलेल्या मिटींगला उपस्थित राहणे तेही वसुली सारख्या विषयावर क्रमप्राप्त आहे आणि म्हणून त्यांना निलंबित करा , अश्या बालिशपणाची मागणी आपल्या सारख्या जबाबदार व्यक्तीकडून अपेक्षित नाही असे प्रसिध्दी पत्रकात
प्रभारी नगराध्यक्ष कुणाल वसावे यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

पालिकेत करवसूली संदर्भात आयोजित बैठकीत मा. आ. चंद्रकांत रघुवंशी यांना नेमक्या कोणत्या अधिकाराने निमंत्रित केले : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी

Next Post

ओम शांती परिवारातर्फे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
ओम शांती परिवारातर्फे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

ओम शांती परिवारातर्फे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add