नंदूरबार l प्रतिनिधी
राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्त व India@75 निमित्त जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय व युवारंग फाउंडेशन, नंदुरबारतर्फे नंदुरबार येथील एस.ए. मिशन हायस्कुल मध्ये विद्यार्थ्यांना ‘एडस् संक्रमण तथा लैंगिक शिक्षण शाळेत देणे योग्य की अयोग्य’ या विषयावर वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
सदर स्पर्धेचे प्रमुख अतिथी म्हणून प्रा. नूतनवर्षा वळवी या होत्या. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मंडलिक, युवारंग फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र लुळे,जिल्हा पर्यवेक्षक विश्वास सूर्यवंशी, सोमनाथ वायफळकर आदी उपस्थित होते. सदरच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक निलाक्षी मनोज मिश्रा व श्रुती चंद्रशेखर पवार यांच्या गृपने, द्वितीय क्रमांक अंकित दिलवरसिंग वळवी व पंकज रतीलाल पाडवी या गृपने, तृतीय क्रमांक पवन लादू पवार या गृपने मिळविला. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यध्यापक व्ही. आर. पवार, ज्यू. कॉलेज पर्यवेक्षक सी. पी. बोरसे,, प्रसाद दीक्षित, मीनल वळवी, वंदना जांबलीसा तसेच राहुल शिंदे, देवेंद्र कासार, ऋषिकेश मंडलिक, शिक्षकवृंद उपस्थित होते.








