नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र बॉस्किंग संघटनेच्यावतीने व नंदुरबार जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या सहकार्याने १२ व्या आरजेसीसीपी स्टार वन व टू पंच परिक्षेचे आयोजन दि.२६ व २७ फेब्रुवारी २०२२ दरम्यान यशवंत विद्यालय, नंदुरबार येथे करण्यात आले. या पंच परिक्षेत महाराष्ट्रातून २५ परिक्षार्थींनी सहभाग नोंदविला.
या परिक्षेत दिनेश बैसाणे, भरत कोळी, सागर कोळी, हेमराज राजपूत, मनिष सनेर, नकुल चौधरी, आकाश माळी, किशोर पाटील, रोशनी पाटील, निलेश धनगर, वसिम शेख, धीरज पाटील, ऋषीकेश अहिरे, भुषण माळी, अमोल पगारे, गोपाल चव्हाण, गणराज कुवर आदी पंच परिक्षा उत्तीर्ण झाले असून सदरील पंच परिक्षा घेण्यासाठी महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष तथा तांत्रिक व विकसन संचालक भरतकुमार व्हावळ व कॅप्टन सुरेश कदम हे उपस्थित होते. यावेळी उत्तीर्ण पंचांचा जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी, प्रा.डॉ.मधुकर देसले, राष्ट्रीय खो-खो पंच अनिल रौंदळ, क्रीडा संघटक प्रा.डॉ.मयुर ठाकरे, फ्लोअर बॉलचे सचिव जितेंद्र माळी, धुळे जिल्हा सचिव मयुर बोरसे, जिल्हा सचिव राकेश माळी, जगदिश वंजारी आदी उपस्थित होते.








