नवापूर l प्रतिनिधी
नवापूर येथील सरदार चौक मध्ये राहणारा कशिश जग्निश शहा हा सुखरुप घरी परतला आहे.कशिश हा एम.बी.बी.एसचा शिक्षणासाठी गेला होता.मात्र रशिया व न्युक्रेनचे युध्द सुरु निर्माण झाल्याने तो काल सकाळी १० वाजता विमानाने विमानतळावर सुखरुप भारतात परतला. दिल्ली हुन सुरत विमानतळावर पोहचला यावेळी कशीशचे वडील जिग्रेश शहा,आई बिनीता शहा,काका विराज शहा,काकु अर्चना शहा यांनी त्याचे सुरत विमानतळावर पेढा भरुन आनंद व्यक्त करत स्वागत केले. मुलगा सुखरुप आल्याचे पाहुन आई वडील परीवार भावुक झाले होते.

नंदुरबार जिल्ह्य़ातील एकूण नऊ विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले असून त्यात यशवंत चौधरी ,कौस्तुभ कैलासचंद्र गवळी, रेखा विजय आगले ,प्रसाद केशव पाटील, राहूल जगदीश परमार, इंद्रजितसिंग मेहरबान पोथीवाल यांच्या सह नवापूर येथील कशीश शाह व आशिका सोनार तसेच तालुक्यातील विसरवाडी येथिल शाहिद बागवान या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेलेले भारतात परत येत असल्याचे पाहुन पालक सुखद झाले आहेत.युक्रेन मधील युद्ध परिस्थिती बघता ते भावुक होत हतबल झालेले दिसून आले होते.कशिश भारतात घरी परतल्याने सर्वांना हायसे वाटले.








