नंदूरबार l प्रतिनिधी
भालेर ता.नंदूरबार येथील शहीद शिरीष कुमार फाऊंडेशन तर्फ़े राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आमरण उपोषणाला मुंबईत आझाद मैदानावर सक्रिय जाहीर पाठिंबा देणारे निवेदन देण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबई मध्ये आझाद मैदानावर राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मराठा समाजाच्या मागण्यांसाठी 26 फेब्रुवारी 2022 पासून सुरू केलेल्या आमरण उपोषणाला मुंबई मध्ये आंदोलन स्थळी जाऊन फाउंडेशनचे अद्यक्ष मुकेश पाटील ,विकार मोरे,सह फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला आणि संभाजीराजे यांना पाठिंब्याचे समर्थन पत्र सादर केले.








