नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय किसान सेनेचे महासचिव तथा भिलीस्थान लायन सेनेचे प्रदेशाध्यक्ष पंडित तडवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत, नंदुरबार तालुक्यातील वासदरा येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .
या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भारतीय किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी भारतीय किसान सेनेचे प्रदेश महासचिव पंडित तडवी, भटके जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जाधव, शहराध्यक्ष राजेश माळी ,तालुकाध्यक्ष बिंदास गावित, तालुका उपाध्यक्ष रिवदास वळवी ,सुरेश जगदेव, भैया मराठे ,सरपंच संतोष वळवी व ग्रामस्थ उपस्थित होते .या स्पर्धेमध्ये तालुक्यातील 38 संघांनी सहभाग घेतला असून ही स्पर्धा 10 दिवस चालणार आहे. युवकांमध्ये खेळा संदर्भात जनजागृती व्हावी तसेच ग्रामीण भागातील युवकांनी विविध स्पर्धे मध्ये भाग घेऊन नंदुरबार जिल्ह्याचे नाव देश पातळीवर न्यावे .यासाठी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . भविष्यात अशाच प्रकारे विविध स्पर्धांचे आयोजन भारतीय किसान सेनेतर्फे करण्यात येईल असे आयोजका मार्फत सांगण्यात आले.








