नंदुबार | प्रतिनिधी-
शासनाने लॉकडाऊनच्या काळात निश्चित वेळेत मुभा दिली असतांनाही रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवून ग्राहकी करणार्या हॉटेल व्हि.टी पॅलेसवर उपनगर पोलीसांनी कारवाई केली. या हॉटेलमध्ये तब्बल १० ग्राहक मिळून आले. याप्रकरणी १३ जणांविरूध्द नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार शहरातील वाका चाररस्ता लगत असलेल्या हाटेल व्हि.टी.पॅलेसमध्ये रात्री उशिरापर्यंत ग्राहकांना मद्य व जेवणाची विक्री सुरू होती. नंदुरबार उपनगर पोलीसांनी हॉटेलवर धाड टाकली असतांना कामगारांसह तब्बल ९ ते १० ग्राक हॉटेलमध्ये बसलेले मिळून आले. यामुळे सोशल डिस्टींगचे उल्लंघन झाले. याबाबत पोशि विलास वसावे यांनी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल मधुकर चौधरी, कैलास राज्या पावरा, रमेश कडु जावरे, निलाह प्रमानंद वळवी, दिपक चिमण वळवी, चेतन विठ्ठल सुळ, मुकेश जगन्नाथ माळी, जयेश गुलाबराव ठाकरे, कमलेश रमेश मराठे, गुरूमुख मनोहर कोटवानी, आकाश जगदिश आहुजा, राम मोहनदास नाथानी, दिपक अर्जुनदास सिंधी यांच्याविरूध्द भादंवि कलम २६८ २६९, २९० सह साथरोग प्रतिबंधक अधिनियम कलम ३, ४ सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ई सह महाराष्ट्र दारूबंदी पोलीस अधिनयम कायदा कलम ३३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रशांत राठोड करीत आहेत.