म्हसावद l प्रतिनिधी
राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री ना.नवाब मलिक यांच्यावर ईडीने बेकायदेशीरपणे व कायद्याचा दुरुपयोग करून कारवाई केली आहे ही कारवाई तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांनी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीतर्फे प्रांताधिकारी कार्यालयासमोर सदर घटनेचा निषेध करून आंदोलन करण्यात आले.
राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री ना नवाब मलिक यांच्यावर ईडीने बेकायदेशीररित्या कार्यवाही केली आहे. नवाब मलिक यांना कुठलीही पूर्वसूचना न देता चौकशीसाठी ताब्यात घेत अटक केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. ही कारवाई लोकशाहीच्या विरोधात असून लोकशाहीचे खच्चीकरण करणारी आहे. ईडीच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्यात अशा प्रकारच्या कारवाया करून महाविकासआघाडी सरकारला टार्गेट करण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकारने ईडीचा अर्थात केंद्रीय तपास पथकांचा दुरुपयोग करणे थांबवावे व बेकायदेशीर असलेली कार्यवाही मागे घेण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी प्रांताधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आंदोलन केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांच्या नेतृत्वात अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष ऍड.दानिश पठाण, शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी जोशी, सेवादल जिल्हाध्यक्ष रवींद्र जावरे, ओबीसी सेलचे जिल्हा समन्वयक निलेश चौधरी, बबलू कदमबांडे, जि.प.सदस्य मोहन शेवाळे, जिल्हा समन्वयक शांतीलाल साळी, तालुकाध्यक्ष माधवराव पाटील, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय खंदारे, नगरसेवक इक्बाल शेख, अलका जोंधळे, रेश्मा पवार, संतोष पराडके, महेंद्र कुवर, सोनवदचे सरपंच राजू वाघ, प्रकाश गुलाले, साहेबराव बिरारे, हिरालाल जगदेव, शोहेब जकेरिया, अक्कलकुवाचे सलीम मकरानी, राजू पाटील, तळोद्याचे पुंडलिक राजपूत, साजीद अन्सारी, संतोष पराडके यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








