Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अपघातात मयत झालेल्या पोलीस कॅान्स्टेबलच्या कुटुंबियांना सहकाऱ्यांनी दिला आर्थिक आधार, नंदुरबार पोलीस पुन्हा एकदा चर्चेत!

team by team
February 24, 2022
in क्राईम
0
अपघातात मयत झालेल्या पोलीस कॅान्स्टेबलच्या कुटुंबियांना सहकाऱ्यांनी  दिला आर्थिक आधार, नंदुरबार पोलीस पुन्हा एकदा चर्चेत!

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार पोलीस दलातील चालक पोलीस अंमलदार निलेश पावरा (वय ३०) यांचे दि.२० नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री मोटरसायकलने घरी जात असताना अपघाती निधन झाले. निलेश पावरा यांना त्याआधी ४ दिवसांपूर्वीच पुत्ररत्न झाले होते. आपले नवजात मुलास पहाण्यास जात असताना हा अपघात झाला होता. निलेश यांच्या आदिवासी कुटुंबाची घरची परिस्थिती पाहून नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस पोलीस अधिकारी व अंमलदारांना आपल्या मयत झालेल्या पोलीस बांधवासाठी प्रत्येकी ५००/- रु वर्गणी काढण्याचे आवाहन केले व स्वतः १० हजार रु. दिले.पोलीस अधीक्षकांच्या आवाहनास प्रतिसाद देत जिल्ह्यांतील सर्व १३०० पोलीस अधिकारी व अंमलदार पुढे आले व त्यांनी सुमारे ६ लाख ५३ हजार रुपये जमा केले. नवजात बालकाचे नामकरण होऊन त्या बालकाला पावरा कुटुंबीयांचे वतीने वारस म्हणून जाहिर केल्यानंतर नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॅा.बी.जी.शेखर पाटील यांच्या नंदुरबार जिल्हा दौऱ्याचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते नंदूरबारचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी या जमा केलेल्या रकमेचा चेक निलेश पावरा यांच्या पत्नीच्या हाती सुपूर्द केला. यावेळी तेथील वातावरण भावनिक झाले होते.
यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक डॅा.बी.जी.शेखर यांनी पोलीस अधीक्षकांच्या संकल्पेनेचे जाहीर कौतुक केले.आपल्या बांधवांच्या मृत्यूनंतर कुटुंबाकडे पहाण्याच्या नंदुरबार पोलीसांच्या माणुसकीच्या दृष्टीची महाराष्ट्र पोलीस दलात चर्चा आहे. नुकतेच एका ७५ वर्षे वृद्धास त्याचे चोरीस गेलेले पैसे वर्गणी काढून परत केल्याबद्दल नंदुरबार पोलीस जोरदार चर्चेत आले होते.आता आपल्या बांधवांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाकडे पहाण्याच्या नंदुरबार पोलीसांच्या माणुसकीच्या दृष्टीची व त्यांच्या कॅप्टनची महाराष्ट्र पोलीस दलात पुन्हा एकदा चर्चा आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रेमातून आर्थिक फसवणूक झालेल्या सावित्रीचा लढा यशस्वी : समुपदेशन केंद्र आणि पोलिस विभागाची मदत

Next Post

शहादा येथे नवाब मलिक यांच्यावर ईडीच्या कारवाईच्या विरोधात राष्ट्रवादीतर्फे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add