Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रेमातून आर्थिक फसवणूक झालेल्या सावित्रीचा लढा यशस्वी : समुपदेशन केंद्र आणि पोलिस विभागाची मदत

team by team
February 24, 2022
in क्राईम
0
प्रेमातून आर्थिक फसवणूक झालेल्या सावित्रीचा लढा यशस्वी : समुपदेशन केंद्र आणि पोलिस विभागाची मदत

नंदुरबार l प्रतिनिधी
प्रेमातून आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सावित्रीबाई चौरे यांनी आपला संघर्ष सुरू केला वर्ष भर विविध ठिकाणी अर्ज, निवेदन देऊन ती न्यायासाठी लढा देत होती. अखेर 1 लाख 30 हजार रुपये आणि दोन वाहणे मिळविण्यात सावित्रीबाई यांना यश आले आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या जनसुनावणी त्यांचा विषय समोर आला होता. महिला समुपदेशन केंद्र नंदुरबार आणि पोलिस विभागाची मदतीने त्यांना दिलासा मिळाला.  वाघाळे ता. नंदुरबार येथील महिलेचा श्रीरामपूर ता. नंदुरबार येथील विवाहित तरुणाशी प्रवासात ओळख झाली. दोघांची मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. लग्नाचे आमिष दाखवून सावित्रीबाई यांच्याकडून पैसे घेतले. त्यांचे एटीएम सुद्धा वापरत होता. अचानक दोन्हींमध्ये वाद झाला. मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही असे सांगून सावित्रीबाई यांच्याशी संपर्क टाळला. तोपर्यंत तरुणाने लाखो रुपये खर्च केले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सावित्रीबाई यांनी पोलिस विभाग, महिला समुपदेशन केंद्र नंदुरबार यांच्याकडे तक्रार दाखल केली. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा उपस्थिती पार पडलेल्या नंदुरबार येथील जनसुनावणीत आपली बाजू मांडली होती. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार ग्रामीण पोलिस ठाणे येथील पोलिस निरीक्षक राहुल पवार यांनी आपल्या टीम सोबत सावित्रीबाई यांची फसवणूक करणार्‍या तरुणाला ताब्यात घेतले. पोलिस खाक्या दाखवताच संबंधित तरुणाने सावित्रीबाई यांचे 1 लाख 30 हजार रुपये आणि दोन दुचाकी परत केल्या आहेत. यावेळी महिला समुपदेशन केंद्रातील जिल्हा समुपदेशक राहुल जगताप आणि अकुली पावरा यांनी सावित्रीबाई यांचे समुपदेशन केले. सावित्रीबाई यांना मिळालेल्या रक्कमेची त्यांच्या बँक खात्यात फिक्स डिपॉझिट करण्यात आले. नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष अँड.सीमा वळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांचा मार्गदर्शनाखाली समुपदेशन केंद्राचे काम सुरू आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

इयत्ता बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल: 5 आणि 7 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षा आता 5 आणि 7 एप्रिल 2022 रोजी होणार

Next Post

अपघातात मयत झालेल्या पोलीस कॅान्स्टेबलच्या कुटुंबियांना सहकाऱ्यांनी दिला आर्थिक आधार, नंदुरबार पोलीस पुन्हा एकदा चर्चेत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add