तळोदा l प्रतिनिधी
अक्कलकुवा व धडगांव तालुक्यातील रिक्त पोलीस पाटलांचा जागा भराव्यात अशी मागणी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी निवेदनात केली आहे.
या बाबत तळोदा उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अक्कलकुवा व धडगांव पोलीस पाटलांची पदे रिक्त असल्यामुळे गांव पाड्यामध्ये गैर सोय होत आहे. गावात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या पोलीस पाटीलांचा रिक्त जागा भरण्यासाठी आपल्या स्तरावर कार्यवाही करावी अशी मागणी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी निवेदनात केली आहे.