म्हसावद l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य वन्यजीव, पशू-पक्षी संरक्षण संस्था पुणे अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातून म्हसावद येथील सर्पमित्र सुधाकर पाटील यांना सर्पतज्ञ निलिमकुमार खैरे यांच्या नावाने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
याबाबत वृत्त असे की, 2012 पासून वन्यजीव,पशू-पक्षी, प्राणी यांसह हजारो साप वाचविण्यासाठी करत असलेले उल्लेखनीय कार्य, त्याबाबत असलेल्या सर्वप्रकारच्या नोंदी,सापांबाबत असलेले गैरसमज,अंधश्रद्धा, विषारी,बिनविषारी सापांची ओळख करून माहीती देणे, याबाबत शाळांमध्ये जावून जनजागृती करणे.ज्या ठीकाणी साप पकडला त्याच ठिकाणी नागरीकांत समाजप्रबोधन करणे या कार्याची दखल घेवून म्हसावद येथील प.पू. सती गोदावरी माता माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक सुधाकर पाटील यांना सर्पतज्ञ निलीमकुमार खैरे यांच्या नावे असलेला मानाचा पुरस्कार पुणे येथे नटसम्राट निळू फुले नाट्यमंदिरात देवून गौरव करण्यात आला.यावेळी पुणे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक नानासाहेब लडकत,मानद वन्यजीव रक्षक आदित्य परांजपे,सर्पतज्ञ अनिलकुमार खैरे,वन्यजीव संरक्षण संस्थेच्या अध्यक्ष सुरेखा बडदे,सचिव विनायक शिवाजी बडदे उपस्थित होते.