नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी जळगाव येथील गटशिक्षणाधिकारी सतिष यु.चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे .त्यामुळे तीन वर्षानंतर शिक्षण विभागाला नियमित शिक्षणाधिकारी मिळाले आहेत.
राज्य शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ मधील शिक्षणाधिकारी व तत्सम पदावर राज्यातील ५२ जणांच्या पदोन्नती करण्यात आल्या आहेत . यात नंदूरबार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी जळगाव येथील गटशिक्षणाधिकारी सतिष यु.चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे .नंदुरबार जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाला नियमित शिक्षणाधिकारी नसल्याने अवघ्या तीन वर्षात सहा वेळा पदभार बदलण्यात आला.त्यामुळे तीन वर्षानंतर शिक्षण विभागाला नियमित शिक्षणाधिकारी मिळाले आहेत. याआधी श्री.चौधरी यांनी नवापूर येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात सन १९९८ ते २००६ या कालावधीत अधिव्याख्याता म्हणून काम पाहीले आहे . त्यामुळे नंदूरबार जिल्ह्यातील शिक्षणाबाबत त्यांना माहिती आहे.त्यामुळे शिक्षण विभागाला त्याचा लाभ होईल.