Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मांडवी ते तळोदा प्रकल्प कार्यालयापर्यंत ६० कि.मी. पायपीट करीत आश्रम शाळेतील विद्यार्थींनींचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

team by team
February 22, 2022
in शैक्षणिक
0
मांडवी ते तळोदा प्रकल्प कार्यालयापर्यंत ६० कि.मी. पायपीट करीत आश्रम शाळेतील विद्यार्थींनींचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

नंदुरबार | प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील मांडवी शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थींनीनी मुलींची समस्या तात्काळ सोडवण्याच्या मागणीसाठी ६० कि.मी. अंतर पायपीट करीत तळोदा प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढला मांडवी आश्रमातून सकाळी ६ वाजता पायपीट करीत दुपारी दीड वाजता तळोदा प्रकल्प गाठले आश्रम शाळेत विद्यार्थिनींना आश्रम शाळेत मुख्यध्यापक समस्या मांडताना उडवाउडवीची उत्तर देतात, डीबीटी अनुदान मिळाले नाही फिजिक्स विषय शिक्षक नाहीत आदींसह आश्रमात समस्यांबाबत 50 विद्यार्थींनीनी ६० किमी पायपीट करत प्रकल्प गाठले.

याबाबत अधिक माहिती अशी कि, धडगांव तालुक्यातील मांडवी शासकीय आश्रम शाळेतील समस्या, मागणीसाठी 50 विद्यार्थींनीनी ६० कि.मी. अंतर पायपीट करीत तळोदा प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढला मांडवी आश्रमातून सकाळी ६ वाजता पायपीट करीत दुपारी दीड वाजता तळोदा प्रकल्प गाठले. विद्यार्थीनी पायी चालत येत असल्याचे माहीत झाले. त्यानंतर विविध संघटनेचे पदाधिकारी यांची अर्ध्या रस्त्यात जाऊन भेट घेतली, त्यात मुलीची प्रमुख मागणी केली की मुख्याध्यापक सूर्यकांत पावरा यांची तात्काळ बदली करण्यात यावी. भौतिकशास्त्र ,भूगोल ,इतिहास या विषयाचे शिक्षण उपलब्ध नाही, अद्यापपर्यत डिबीटीची रक्कम देण्यात आली नाही.वीज नसल्यावर गावातून पाणी आणावे लागत आहे.कन्या शाळेत मुली जास्त असल्याने याठिकाणी स्वयंपाक करण्यार्‍या कर्मचारी याची कमरता आहे.अशी मागणी असून त्याच्या मागण्या या रास्त असून तात्काळ सोडविण्यात यावी असे निवेदन प्रकल्प अधिकारी यांना देण्यात आले.यावेळी निवेदन देतांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. रुपसिंग वसावे,ऍड गणपत पाडवी, विनोद माळी, बबिता राहसे,अनिता पावरा, उर्वीशा राहसे,प्रिया पावरा,आधी उपस्थित होते.

दरम्यान राज्याचे आदिवासी मंत्री असणार्‍या ॲड.के.सी.पाडवी यांच्या मतदार संघातच विद्यार्थींनीनी समस्या सोडवण्यासाठी ६० किमी पायपीट करावी लागते ही दुदैवाची बाब आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल; आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या समावेश

Next Post

महिलांना लज्जा वाटेल असे कृत्य करुन विनयभंग करणार्‍या आरोपीस तळोदा न्यायालयाने ठोठावली कारावासाची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add