नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरातील पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस नवीन शौचालय बांधकाम करत असताना स्लॅप कोसळल्याच्या घटनेने परिसरातील नागरिक आश्चर्य व्यक्त करीत भयभीत झाले आहेत.नवापूर शहरात नगर परिषदेकडून अनेक विकास कामे सुरू आहेत.परंतु बांधकाम करतांना नियम धाब्यावर बसवून कामे करत आहे असा आरोप केला जात असुन त्यामुळे नवापूर नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचा भ्रष्टाचार आजच्या दुर्घटनेमुळे चव्हाट्यावर आले आहे.
नवापूर नगर परिषद हद्दीतील पोलीस लाईनच्या मागील बाजूस शौचालय बांधकाम सुरू आहे.सदर बांधकाम अजून अपूर्ण अवस्थेत आहे.त्या ठिकाणी ठेकेदाराकडून सर्व नियमांना केराची टोपली दाखवली जात आहे.बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी काम कोणत्या योजनेतून आहे ठेकेदार कोण?किती निधी दिला आहे असा फलक लावणे अनिवार्य असतांना नियमाची पायमल्ली केली गेली असून आज ज्या ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी वस्ती असून शौचालयाचा स्लॅप कोसळल्याची घटना घडली आहे स्लेप कोसळला तेथे एक महिला व लहान मुलगा थोडक्यात बचावला असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. या कारभारा ला कोणी तरी पाठीशी घालत असल्याचे चित्र निदर्शनात आले असून नगर परिषदेच्या भ्रष्ट कारभार या दुर्घटनेतुन स्पष्ट दिसत असला तरी तेरी भी चूप मेरी भी चूप असे होईल असे चित्र असुन सदर बांधकामाची चौकशी होईल काय? असा सवाल केला जात असुन या बांधकामाची चौकशी व्हावी अशी चर्चा जनसामान्यांच्या बोलण्यातून व्यक्त केली जात आहे.