म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील बामखेडा त.त. शिवारात करुणाबाई छोटूलाल चौधरी यांच्या मालकीच्या शेतात दीड एकर ऊस लागवड करण्यात आला होता.शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दीड एकर ऊस जळून खाक झाला तर त्याचा बाजूला असलेल्या प्रकाश विठ्ठल पटेल यांच्या मालकीच्या शेतात तीन एकरशेतात चार महिन्यापूर्वी लागवड करण्यात आलेल्या कोवळ्या उसाचे पीक देखिल जळून खाक झाले आहे.
शहादा तालुक्यातील बामखेडा येथील शेतकरी सौ.करुणा बाई छोटूलाल चौधरी यांचा दीड एकर क्षेत्रात उसाची लागवड केली होती.तर त्यांचा शेतालगत असलेल्या प्रकाश विठ्ठल पटेल यांच्या तीन एकर शेतात चार महिन्यापूर्वी उसाचे पिकाचे लागवड करण्यात आली होती.दि १९फेब्रुवारी 4:30 वाजेच्या सुमारास शेतातून गेलेल्या तारांच्या स्पर्श होत शॉर्टसर्किट झाल्याने करुणाबाई चौधरी यांच्या शेतातील तोडणीवर आलेल्या दीड एकर ऊस तर प्रकाश विठ्ठल पटेल यांच्या तीन एकर शेतातील कोवळे ऊसाचे पीक पूर्णपणे जळून खाक झाल्याने लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी तात्काळ आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले पण यश आले नाही.
शॉर्टसर्किट नुकसान झाल्याने महावितरण विरोधात देखील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांची घटनास्थळी धाव घेत रात्री उशिरापर्यंत नवीन डिओ बसविण्याचे काम करण्यात येत होते.शॉटसर्किटने लागलेल्या ऊसाच्या पिकाला लागलेल्या आगीची माहिती मिळताच महावितरनांचे कर्मचारी यांनी भेट देऊन शेत शिवारातील गेलेल्या तारांची पाहणी करत नवीन डीओ बसविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.