नंदुरबार | प्रतिनिधी
येथील लायन्स क्लब, स्पाईन फाउंडेशन मुंबई व जिल्हा रुग्णालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कंबर पाठ व मानेच्या मणक्यांच्या मोफत शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाली.
या शिबिरासाठी नंदुरबार जिल्ह्यासह व शेजारील जिल्ह्यातील रुग्णांची पूर्व तपासणी करून त्यातील गरजवंत रुग्णांवर स्पाईन फाउंडेशन मुंबईच्या डॉ. शेखर भोजराज (लीलावती हॉस्पिटल, मुंबई), डॉ.प्रेमिक नागद, डॉ. तुषार देवरे, डॉ.हरिकृष्णन ए., डॉ.हर्षित दवे, डॉ.ओमाश भारद्वाज, डॉ.डिम्पल सिंग तसेच जिल्हा रुग्णालयातील डॉ.संजय गावित, डॉ.किरण जगदेव, डॉ.मंगल पावरा, डॉ.राहुल वसावे या टीमने ९ रुग्णांची मणक्या यांसंबंधीची जटील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. या एका शस्त्रक्रियेचा खाजगी रुग्णालयातील खर्च ३ लाख ते ५ लाख रुपये इतका येत असतो. स्पाईन फाउंडेशन व लायन्स क्लब नंदुरबारने ३० ते ४० लाख रुपयांच्या या शस्त्रक्रिया मोफत करून दिल्यात. याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष शेखर कोतवाल, सचिव राहुल पाटील, सदस्य सतीश चौधरी, राजेंद्र महेश्वरी जिनेंद्र जैन, मयूर राजपूत, समीर शहा, शंकर रंगलानी उपस्थित होते. प्रोजेक्ट चेअरमन डॉ.सी.डी. महाजन होते.याप्रसंगी स्पाईन फाऊंडेशन व लायन्स क्लबतर्फे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व ऑपरेशन टीमला त्यांच्या सेवा कार्याबद्दल सन्मानपत्र देण्यात आले. स्पाईन फाऊंडेशनच्या डॉक्टर व सपोर्टिंग स्टाफला त्यांच्या निस्वार्थ सेवा कार्यासाठी लायन्स क्लबच्या वतीने मानपत्र देण्यात आले.